हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रिलायन्स Jio कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नेहमी काही ना काही ऑफर आणत असते. कधी रिचार्ज प्लॅन, तर स्वस्तात मोबाईल अशा विविध गोष्टी जिओ आपल्या ग्राहकांसाठी आणत असत. आता अशीच एक नवीन ऑफर Jio ने ग्राहकांसाठी आणली आहे. जर तुम्ही दीर्घ काळासाठी रिचार्ज करत असाल तर तुम्हाला एका महिन्यासाठी Jio कडून वायफाय मोफत मिळण्याची सुवर्णसंधी दिली जाणार आहे. काय हा प्लॅन जाणून घेऊयात.
तुम्ही 12 महिन्यासाठी जर जिओचे रिचार्ज करत असाल तर तुम्हाला मोफत वायफायची सुविधा मिळणार आहे. तसेच वापरकर्त्यांनी जिओ फायबर पोस्टेड योजना निवडल्यास त्यांना कोणतेही इन्स्टॉलेशन भरण्याची आवश्यकता भासणार नाही. जर तुम्ही JioFiber वापरकर्ता असाल किंवा नवीन कनेक्शन घेणार असाल, तर तुम्हाला कंपनी 30 दिवसांसाठी मोफत हाय-स्पीड इंटरनेटचा लाभ देत आहे. तुम्ही 12 महिन्यांसाठी एकदम रिचार्ज केल्यास तुम्हाला त्याच १ महिना फ्री इंटरनेट दिले जात आहे. त्याचप्रमाणे 6 महिन्यांसाठी Jio Fiber च्या प्लानअंतर्गत रिचार्ज केले तर तुम्हाला 15 दिवसांसाठी जिओची मोफत कनेक्टिव्हिटी दिली जाईल. त्यामुळे 6 महिन्यांनंतरही या योजनेचा लाभ पुढील 15 दिवस मोफत घेता येईल.
Jiofiber काय आहे नेमक?
Jio fiber ही जिओची एक नवीन वायरलेस सुविधा आहे. जी हाय स्पीड इंटरनेट सुविधा प्रदान करते. यामध्ये तुम्हाला 1 Gbps इतका वेगवान इंटरनेट स्पीड मिळु शकतो. जे पारंपारिक फायबर-ऑप्टिक कनेक्शन इतकेच वेगवान आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 30 Mbps ते 1 Gbps पर्यंतच्या स्पीडसह कोणताही प्लॅन निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. यामध्ये तुम्हाला इतर फायदेही मिळतील.
काय असतील सुविधा
तुम्हाला JioTV+ आणि इतर प्रीमियम OTT ऍपच्या प्रवेशासह 1 Gbps पर्यंत हाय-स्पीड इंटरनेट देते. याशिवाय JioFiber वापरकर्त्याला मोफत HD लँडलाइन कॉलिंग, टीव्ही-टू-टीव्ही व्हिडिओ कॉलिंग, इमर्सिव्ह Python अनुभव, JioSecurity, Home Networking आणि इतर अनेक वैशिष्ट्यांचा समावेश जिओ फायबर मध्ये होतो.