धक्कादायक ! रुग्णालयातील मोफत wifi वापरून रूग्णाने डाउनलोड केले तब्ब्ल 80 हजार अश्लील व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउनमध्ये जगभरात मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये लक्षणीयरित्या वाढ झालेली आहे. प्रत्येक देशात मुलांच्या संरक्षणासाठी काही कायदे केले गेले आहेत, परंतु तरीही, गुन्हेगार या मुलांचे आयुष्य उध्वस्त करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. गुन्हेगारी मानसिकता असलेली अशी लोकं कुठल्याही परिस्थितीत केवळ गुन्ह्याबद्दलच विचार करत असतात. आता, रुग्णालयात दाखल केलेला एखादा रुग्ण सार्वजनिक वायफायवरून अश्लील डाउनलोड करीत असेल याची कल्पना कोणाला करता आली असेल? फक्त एकच नाही तर तब्ब्ल 80 हजार. होय, हे सर्व अश्लील चित्रपट मुलांचे होते. जेव्हा त्याचा लॅपटॉप शोधला गेला तेव्हा त्यात हजारो चाइल्ड पॉर्न मुव्हीज सापडलल्या.

यानंतर एका 54 वर्षीय वृद्ध ट्रान्सजेंडर महिलेस अटक करण्यात आली. आता या महिलेला पुरुषांच्या तुरूंगात टाकायचं की नाही या संभ्रमात पोलिस आहेत.या ट्रान्सजेंडर महिलेच्या लॅपटॉपवरून पोलिसांना तब्ब्ल 80 हजार मुलांच्या पॉर्न मुव्हीज मिळाल्या आहेत. आपल्या 14 वर्षांच्या कालावधीत हि छायाचित्रे तिने घेतली. यासाठी तिला नऊ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.

या 54 वर्षीय आरोपीचे नाव ज्युली मार्शल अशी आहे. रुग्णालयात पलंगावर पडलेले तिने सार्वजनिक wifi च्या माध्यमातून ही सर्व अश्लील छायाचित्रे डाऊनलोड केली होती. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर तिला ऑगस्ट 2017 पासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ज्युलीला ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे इंटरनेट पॅक लवकरच संपत होता. हे सार्वजनिक wifi च्यापेक्षा बरेच वेगवान होते. अशा परिस्थितीत व्यवस्थापनाने सगळ्या इंटरनेटचा वापर जास्त कुठे केला जातोय याचा तपास केला. यात ज्युलीच्या सिस्टमवरून डाउनलोड होत असल्याचे उघड झाले.

जेव्हा तिचा मोबाइल तपासला गेला तेव्हा त्यात मुलांच्या अश्लील प्रतिमा दिसल्या. यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी केवळ जुलीचा मोबाइलच ताब्यात घेतला नाही तर तिच्या घरीही गेले.

घरी गेल्यानंतर जुलीचे दोन लॅपटॉप, एक फोन आणि अनेक सीडीही जप्त करण्यात आल्या. त्यापैकी एकूण 80 हजार चाइल्ड पॉर्न मुव्हीज सापडल्या. हे फोटो जून 2004 ते एप्रिल 2018 दरम्यान सबमिट केले गेले होते.

जेव्हा कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा या छायाचित्रांना दहा प्रकारांमध्ये विभागले गेले. त्यानुसार कोर्टाने जूलीला 9 महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. कोर्टाने तिला पुन्हा अशी चूक करू नका असे बजावले आहे. पण आता कोर्ट आणि पोलिसांसमोर एक समस्या निर्मांण झाली आहे की आता जुलीमा महिलांच्या तुरुंगात घालावे कि पुरुषांच्या. आता यासंदर्भात कोर्ट आणि पोलिस तज्ञ एकमेकांशी सल्लामसलत करीत आहेत.

2016 मध्ये यूकेमधील ट्रान्सजेंडर गुन्हेगारांना महिलांच्या कक्षात ठेवण्यात आले होते. परंतु काही प्रकरणांमध्ये त्यांनी महिला कैद्यांवर हल्ला केला, त्यानंतर त्यांना पुरुषांच्या कक्षात ठेवण्यात आले. परंतु इतर गुन्हेगार हे पुरुषांच्या सेलमध्ये त्यांच्यावर हल्ला करतात. या कारणास्तव, ज्यूलीच्या बाबतीत, पोलिस त्याला गोंधळात पडले आहे की त्याला कुठे ठेवावे?

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment