औरंगाबाद: सशस्त्र दरोडेखोरांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश केला.व शास्त्राचा धाक दाखवत बहिणीचे मंगळसूत्र हिसकवले. आरडाओरड होताच झोपलेले दोन्ही भाऊ जागे झाले. व त्यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार करीत त्यांना पळवून लावले मात्र मंगळसूत्र घेऊन दरोडेखोर पसार झाले.यामध्ये एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.ही घटना शनिवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास तिसगाव मध्ये घडली.या घटनेमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
या घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की, दुर्गेश कृष्णा गायकवाड आणि जयराज कृष्णा गायकवाड या दोन्ही सख्ख्या भवांचा परिवार एकाच इमारतीत राहतो. तर त्यांची बहीण जयश्री जाधव ही माहेरी अली होती. शनिवारी सर्वजण घरात झोपलेले असताना मध्यरात्री दोन वाजेच्या सुमाराला हातात तलवार,कोयता सारखी शस्त्र घेऊन तीन दरोडेखोरांनी घराचा पाठीमागील दरवाजा तोडून घराच्या आत प्रवेश केला व इतर तीन ते चार साथीदार हे बाहेर उभे होते.
दरम्यान खालच्या मजल्यावर काहीही न भेटल्याने दरोडेखोरांनी त्यांचा मोर्चा वरील मजल्यावर वळविला व त्या मजला वर जयश्री या एका खोलीत झोपलेल्या होत्या.त्या खोलीचा कडी- कोयनडा तोडून तिघांनी आत प्रवेश केला.आवाज झाल्याने जयश्री या झोपेतून उठल्या तेच त्यांच्या समोर हातात शस्त्र घेऊन दरोडेखोर उभे होते.हे दृश्य पाहून त्या भेदरल्या दरोडेखोरांनी त्यांना गळ्यातील सोन्याचे अडीच ग्राम चे मंगळसूत्र काढून दे अन्यथा मारून टाकू अशी धमकी दिली.भेदरलेल्या जयश्री यांनी गळ्यातील मंगळसूत्र काढून दिले दरम्यान त्यांनी आरडाओरड केली.आरडाओरड केली ते ऐकताच दुर्गेश आणि जयराज हे दोन्ही भाऊ जागे झाले व मात्र दोघांच्याही खोलीचा दरवाजा बाहेरून लावल्याने त्यांना येता येत न्हवते.बाहेरून कडी लावल्याचे लक्षात येताच दुर्गेश ने गॅलरीतूंन उडी घेत.त्याच्या खोलीचा आणि भावाच्या खोलीचा दरवाजा उघडला व दोघांनी बहिणीच्या खोलीकडे धाव घेतली तेंव्हा दरोडेखोरसोबत सुमारे 10 ते 15 मिनिटे झटापट झाली. आरडाओरड आणि गावकरी जागे होतील,आपण पकडले जाऊ या भीतीने दरोडेखोरांनी दोघांना लोटत तेथून पळ काढला.
या झटापटीत दुर्गेश च्या डाव्या हाताला गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच साह्ययक आयुक्त विवेक सराफ,गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, वाळूज एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी घटनास्थळी भेट देत.ठसे तज्ञाना पाचारण केले आहे.या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरोडेखोरांच्या शोधासाठी विविध पथके तैनात करण्यात आली असून परिसरात त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. लॉकडाऊन काळात गजबजलेल्या तिसगावात अशा प्रकारे दरोड्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात राहणाऱ्या गावकाऱ्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात पोलीसांची रात्र गस्त वाढविण्याची मागणी राहिवाश्या कडून होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा