वारंवारं बलात्कार : गावातील महिलेशी शारीरिक संबंध ठेवून काढले फोटो अन् लाखो रूपयांला गंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा तालुक्यातील एका गावातील महिलेशी शारीरिक संबंध ठेवून त्याचे फोटो काढून ते महिलेच्या पती, मुलगा, नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला. तसेच धमकी देत महिलेच्या गळ्याला चाकू लावून लाखो रुपयांना गंडाही घातल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेली माहीती अशी, स्वरुप महादेव गुजर (वय ५०, रा. हिरण्या प्राईड अपार्टमेंट, तामजाईनगर, सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सन २०१८ ते २१ मे २०२१ या कालावधीत स्वरुप महादेव गुजर याने महिलेला धमकी देणे, पैसेला गडा घालणे व वारंवारं बलात्कार केला आहे. या काळात स्वरूपने पीडित महिलेशी शारीरिक संबंधाचे फोटो काढले. नंतर या कालावधीत सातत्याने हे फोटो तिच्या पती, मुलगा, नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देत वारंवार तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले.

सदरील महिलेने संबंधास नकार दिल्यानंतर स्वरूपने महिलेच्या गळ्याला चाकू लावून तिच्याकडून बँकेचा एटीएमचा पीन क्रमांक घेवून तिच्या बँक खात्यातून १ लाख ५० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतरही आणखी पैसे घेतले असे २ लाख रुपये धमकी देवून काढून घेतले असल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी स्वरुप गुजर याच्यावर शाहपुरी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक करण्यात आली असून तपास उपनिरीक्षक ए. बी. वाघमारे करत आहेत.