मागील ६ वर्षांत भारतीय लष्कराने खरेदी केला ९६० कोटींचा निकृष्ट दर्जाचा दारुगोळा

नवी दिल्ली । पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारत-चीनमध्ये तणाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा तणाव सुरू आहे. तर पाकिस्तानकडून सीमेवर सतत गोळीबार सुरू आहे. अशा तणावाच्या परिस्थितीत लष्कराचा महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालातून भारतीय लष्कराने ऑर्डीनन्स फॅक्टरीच्या निकृष्ट दर्जाच्या दारुगोळ्यावरून संताप व्यक्त केला आहे. गेल्या ६ वर्षात सरकारी आयुध निर्माणीकडून ( ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड ) जो ९६० कोटींचा निकृष्ट दर्जाचा दारुगोळा खरेदी केला आहे, तेवढ्या निधीत लष्कराला जवळपास १०० तोफा मिळाल्या असत्या. हा दावा लष्कराअंतर्गत केलेल्या अहवालात करण्यात आला आहे.

हा अहवाल संरक्षण मंत्रालयाला देण्यात आला आहे. २०१४ ते २०२० या कालावधीत निकृष्ट दर्जाचा दारुगोळा खरेदी करण्यात आला आहे. या दारुगोळ्याची किंमत जवळपास ९६० कोटींवर पोहोचली आहे. याच निधीत 150 MM या मध्यम पल्ल्याच्या तोफा लष्कराला उपलब्ध होऊ शकल्या असत्या. ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्ड (OFB) संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या जगातील सर्वात जुन्या सरकारी ऑर्डीनन्स प्रोडक्शन युनिट पैकी एक आहे. त्याअंतर्गत सैन्यासाठी दारुगोळा तयार केला जातो. यावर लष्कराने टीका केली आहे. त्रुटी आढळून आलेल्या उत्पादनांमध्ये 23-एमएम एअर डिफेन्स शेल, तोफगोळे, 125 मिमी रणगाड्यांच्या तोफगोळ्यांसह वेगवेगळ्या कॅलिबरच्या गोळ्यांचा समावेश आहे. निकृष्ट दर्जाच्या दारुगोळ्यामुळे केवळ पैसाच नाही तर अनेक घटनांमध्ये मानवी नुकसानही झाले आहे.

निकृष्ट दर्जाच्या दारुगोळ्यामुळे होणाऱ्या घटना आणि मानवी हानी या आठवड्या एक अशा सरासरीने घडत आहेत. असा दावा लष्कराच्या या अहवालात करण्यात आला आहे. २०१४ पासून निकृष्ट दर्जाच्या दारुगोळ्यामुळे ४०३ घटना घडल्या आहेत. या घटनांचे प्रमाण कमी झाले असले तरी ते चिंताजनक आहे, असं या अहवालात नमुद करण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com