चेष्टा पडली महागात ! मित्रानेच केली मित्राची हत्या

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाला मित्राची चेष्टा करणे चांगलेच महागात पडले आहे. हि चेष्टा त्याच्या जीवावर बेतली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मृत तरुण व आरोपी या परिसरात कचरा गोळा करण्याचे काम करायचे. या दोघांमध्ये दोन दिवसांपूर्वी एकमेकांची चेष्टा करण्यावरून वाद निर्माण झाला होता.

या वादाचे नंतर भांडणात रूपांतर झाले. त्यानंतर आज सकाळी एस आर एम गुजराती शाळेजवळ कामाच्या ठिकाणी हे दोघे एकत्र आल्यानंतर पुन्हा त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद एवढा वाढला कि आरोपी तरुणाने मित्र अमन यादव याच्यावर चाकूने सपासप वर केले. या घटनेत अमन यादवचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी तरुण कुठेही पळून न जाता थेट पोलीस स्टेशनला गेला.

आरोपीने फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये हजर होत आपला गुन्हा कबुल केला. आरोपीने दिलेल्या माहितीनंतर पोलीस स्थानकात मोठी खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खातरजमा केली. यानंतर पोलिसांनी मृत अमानला रुग्णालयात दाखल केले पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

You might also like