लग्नाला निमंत्रण न दिल्याने मित्राने पाडले नवरदेवाचे दात

औरंगाबाद – लग्नाला मित्राला बोलावले नाही. लग्नाची माहिती मित्राला झाल्यानंतर त्याने लग्न केल्याचे सांगितले का नाही असा जाब विचारला. त्यावर नवरदेवाने तुला कोणी सांगितले असे म्हणताच हातातील खड्याने नवर्देवाची दात पाडल्याची घटना शहरातील वसुंधरा कॉलनी येथे घडली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद रामजी अंभोरे (32, रा. बजाजनगर, वाळूज एमआयडीसी) यांचे नुकतेच लग्न झाले आहे. अरविंद यांनी लग्नात मित्र कुणाल सपकाळ (रा. वसुंधरा कॉलनी) यास बोलावले नव्हते. 13 एप्रिल रोजी वसुंधरा कॉलनीत भेट झाल्यानंतर वादावादी होऊन कुणालने नवरदेवास हातातील कडे मारून जखमी केले. यामध्ये अरविंदचे अनेक दात ढिले झाले तर काही पडले आहेत तसेच होटाला मोठी जखम झाली.

कुणाल नेरोड नवरदेवाच्या पाठीत व डोक्यात मारहाण केली. या प्रकरणी नवरदेवाचा तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.