१ जुलै पासून ATM वरुन पैसे काढण्याचा ‘हा’ नियम बदलणार; तुमच्या खिशावर होण‍ार परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउन आणि कोरोनामुळे आधीच आर्थिक दबावात असलेल्यांना ही बातमी एका धक्क्यापेक्षा कमी नाही आहे. येत्या १ जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्याचे नियम आता बदलले जात आहेत, यामुळे तुमच्या खिशावरील ताण वाढेल. १ जुलैपासून एटीएम कॅश पैसे काढणे आपल्यासाठी महाग होणार आहे. होय, कोरोना संकटाच्या वेळी वित्त मंत्रालयाने एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठीचे सर्व ट्रॅन्झॅक्शन फी मागे घेतली होती. एटीएम ट्रॅन्झॅक्शन फी तीन महिन्यांसाठी माफ करून सरकारने कोरोना संकटाच्या वेळी लोकांना मोठा दिलासा दिला होता. मात्र ही सूट केवळ तीन महिन्यांसाठीच देण्यात आली होती, जी की ३० जून २०२० रोजी संपणार आहे.

१ जुलैपासून एटीएममधून कॅश पैसे काढणे महाग होईल
लॉकडाऊनच्या दरम्यान अर्थमंत्र्यांनी तीन महिन्यांसाठी एटीएम ट्रॅन्झॅक्शन फी घेणे रद्द केलेले होते. म्हणजेच या दरम्यान तुम्हाला जितक्या वेळा एटीएममधून पैसे काढायचे असतील, त्यासाठी तुम्हाला कोणतीही ट्रॅन्झॅक्शन फी भरावी लागणार नव्हती, मात्र ही देण्यात आलेली सूट ३० जून रोजी संपुष्टात येणार आहे. हा नियम बदल फक्त ३ महिन्यासाठीच करण्यात आला होता, ज्याची मुदत ३० जून रोजीच संपणार आहे. ही सूट सरकारने केवळ एप्रिल, मे आणि जून महिन्यांसाठी दिली होती. आता ही तारीख संपत आहे. म्हणजेच १ जुलैपासून तुम्हाला पुन्हा एकदा एटीएममधून पैसे काढण्यासाठी ट्रॅन्झॅक्शन फी भरावी लागेल. अर्थमंत्री याबाबत म्हणाल्या की, लोकांना पैसे काढण्यासाठी बँकेत जावे लागू नये म्हणून सरकारने एटीएमची ट्रॅन्झॅक्शन फी मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.

५ ट्रान्झॅक्शन नंतर शुल्क आकारले जाईल
एटीएम ट्रान्झॅक्शन गाइडलाइंसनुसार जुने नियम १ जुलैपासून पुन्हा लागू होतील, त्यानुसार तुम्ही इतर कोणत्याही बँकेतून महिन्यात जास्तीत जास्त ५ वेळा कॅश ट्रान्झॅक्शन केल्यास तुम्हाला ट्रान्झॅक्शन फी भरावी लागेल. म्हणजेच १ जुलै २०२० पासून सर्व बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या एटीएममधून महिन्यातून फक्त ५ वेळाच पैसे काढण्याची परवानगी मिळणार आहे. यानंतर पैसे काढल्यास आपल्याला त्यासाठीचे शुल्क भरावे लागेल. हे शुल्क बँकांनी निश्चित केलेले आहे.

एटीएममधून पैसे काढण्यासाठी किती शुल्क आहे?
एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी बँकांनी काही नियम लावले आहेत. साधारणत: बँका या एका महिन्यातून ५ वेळा फ्री ट्रान्झॅक्शन करण्याची मुभा देतात. म्हणजेच, जर तुम्ही तुमच्या बँकेतून एका महिन्यात ५ पेक्षा जास्त वेळा कॅश काढून घेतली तर तुम्हाला ८ ते २० रुपये शुल्क भरावे लागेल. दुसरीकडे जर आपण इतर बँकेच्या कोणत्याही एटीएममधून पैसे काढले तर ५ फ्री ट्रान्झॅक्शनची मर्यादा ही ३ पर्यंत कमी केली आहे. म्हणजेच आपण दुसर्‍या बँकेच्या एटीएम मशीनमधून केवळ ३ वेळाच फ्री ट्रान्झॅक्शन करू शकता. यानंतर, पैसे काढण्यासाठी तुम्हाला ट्रान्झॅक्शन फी द्यावी लागेल, जे तुम्ही एटीएममधून किती पैसे कॅश काढता यावर अवलंबून असते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment