सोमवार पासून पुण्यात काय सुरू आणि काय बंद; पहा फक्त एका क्लिक वर

Ajit Pawar Pune
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आल्यानंतर राज्य सरकार कडून लॉकडाऊनच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता आणली आहे.दरम्यान पुण्याचा समावेश तिसऱ्या स्तरात करण्यात आला आहे. तिसऱ्या स्तरानुसार पुण्यात अत्यावश्यक सेवेसह इतर दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहणार आहेत. थिएटर आणि नाट्यगृह मात्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यात काय सुरू आणि काय बंद –

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने सर्व दिवस दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील.

अत्यावश्यक सेवांच्या व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत सुरु राहतील. शनिवार रविवार पुर्ण बंद राहतील.

मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह पूर्णतः बंद राहतील.

रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. दुपारी 4 नंतर शनिवार, रविवार फक्त पार्सल सेवा रात्री 11 पर्यंत सुरू राहील.

पुणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे उद्याने, खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सुरू राहतील.

खासगी कार्यालये कामाच्या दिवशी 50 टक्के कर्मचारी क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार परवानगी

लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर शासकीय बैठका क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती

वास्तव्यास मजूर असलेल्या ठिकाणी बांधकामाला दुपारी चारपर्यंत मंजुरी

ई कॉमर्स, साहित्य सेवा पुरवठा नियमितपणे सुरू

 

पुण्यात काय बंद राहणार –

शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर दुकानं बंद

मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील

इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील.

सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम शनिवार, रविवार बंद

संध्याकाळी पाचपर्यंत जमावबंदी. सायंकाळी पाचनंतर संचारबंदी

दारुची दुकानं शनिवारी आणि रविवारी बंद. फक्त होम डिलीव्हरी

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.