Monday, January 30, 2023

आता दर अर्ध्या तासाला धावणार वाळूज ते औरंगाबाद सिटीबस

- Advertisement -

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. यावेळी शाळा, महाविद्यालय, बाजार, मार्केट, रेल्वे, बस, दुकाने बंद ठेवण्यात आले होते. आताशा दुसरी लाट कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना शासनाने निर्बंध लागू करून काही अंशी अनलॉक केले आहे. सध्या दुकाने रेल्वे बससेवा मॉल मार्केट बाजार ठरवलेला वेळेमध्ये सुरू आहे. त्याच बरोबर आता वाळूज ते औरंगाबाद ही शहर बस दर अर्ध्यातासाला धावणार आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या वतीने वाळूज परिसरातील प्रवासी आणि विद्यार्थ्यांसाठी दर अर्ध्या तासाला बस सेवा सुरू करण्यात आली आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे वाळूज गावातील लोकसंख्या मागील काही वर्षात वाढली आहे. याठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना औरंगाबादला ये जा करावी लागते. परंतु बस कमी असल्यामुळे आणि दिलेल्या वेळेतच असल्यामुळे तारांबळ उडते. म्हणूनच आता अर्ध्यातासाला बस सेवा सुरु करण्यात आली आहे.

- Advertisement -

सकाळी पहिली बस 6 वाजून 20 मिनिटांनी राहील तर शेवटची बस सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी असेल. दुसरी बससेवा वाळूज ते मुकुंदवाडी दरम्यान सुरु करण्यात आली आहे. वाळूज ते मुकुंदवाडी सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी तर तिसरी बस 6 वाजून 10 मिनिटांनी आणि शेवटची रात्री 7 वाजून 2 मिनिटांनी असणार आहे अशी माहिती वाहतूक निरीक्षक भरत बहुरे यांनी दिली.