दिल्लीत आजपासून सम-विषम; नियमभंग केल्यास ४ हजार दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या प्रदुषण पातळी मध्ये वाढ झाल्यामुळे संपूर्ण शहरात धुराचा एक थर हवेमध्ये तयार झाला आहे. त्यामुळे स्वच्छ असलेलं वातावरण आता धुरमय झाल्याने नागरिकांना श्वसनाचा व इतर त्रास होत आहे. यासाठी दिल्ली मध्ये पुन्हा ०४-०५ नोव्हेंबर पासून सम विषम योजनेवर कार धावतील. यातून दिल्ली सरकारने अपंग व्यक्ती, दुचाकी आणि आपत्कालीन सेवा, राष्ट्रपती, पंतप्रधान, दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर यांच्यासह इतर घटनात्मक पदे असणारी व्यक्ती यांना सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली सरकार आज सोमवारपासून सम विषम ही योजना राबवित आहे. नियमांचे पालन न केल्यास वाहनचालकांना 4 हजार रुपये दंड आकारला जाईल. त्यांचे मंत्रिमंडळ आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह दिल्लीचे सर्व अधिकारी या योजनेंतर्गत राहतील. यावेळी सीएनजी आणि संकरित गाड्यांनाही सूट दिली जाणार नाही. प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकार अजून प्रभावी योजना काय असतील यावर विचार करत आहे.

आजपासून चालू होणाऱ्या या योजने बाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली वासियांसाठी संदेश दिला आहे, “नमस्कार दिल्ली, प्रदूषण कमी करण्यासाठी आजपासून ऑड इव्हन सुरू होत आहे. आपल्या आरोग्यासाठी, आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या श्वासासाठी समविषमचे अनुसरण करा. कार सामायिक करा यामुळे मैत्री वाढेल, संबंध निर्माण होतील, पेट्रोल वाचतील आणि प्रदूषण कमी होईल.”

सम-विषम म्हणजे काय?
सम विषम नियमांमध्ये वाहनाचा शेवटचा नंबर हा यासाठी गृहीत धरला जाणार असेल. जर शेवटची संख्या 1, 3, 5, 7, 9 असेल तर ती 5, 7, 9, 11, 13, 15 नोव्हेंबरला रस्त्यावर धावेल. तर 2, 4, 6, 8 क्रमांक असलेली वाहने 4, 6, 8, 10, 12 आणि 14 नोव्हेंबरला धावतील.

Leave a Comment