फडणवीस सरकारच्या काळात ६५ हजार कोटींचा घोळ; ‘कॅग’च्या अहवालातील माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
टीम, HELLO महाराष्ट्र। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ६५ हजार कोटींचा घोळ झाला असून, त्यावर कॅग ने ताशेरे ओढले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. २०१७- १८ या आर्थिक वर्षांत हा घोळ झाला असून, ३१ मार्च २०१८ रोजी ६५ हजार ९२१ कोटी रकमेची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करण्यात आली नसल्यचे कॅग ने म्हटले असल्याचे पाटील यांनी सांगितले. 
नागपूरला सुरु असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला असता हि माहिती दिली आहे. पाटील म्हणाले की आमचं सरकार हे काही चौकशी  सरकार नाहीं. परंतु जे कॅग ने म्हटले आहे त्याची दखल घ्यावीच लागणार आहे. कारण जे रेकॉर्डवर दिसत आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
दरम्यान, अजित पवारांना मिळालेल्या क्लीनचिट वर बोलताना पाटील म्हणले, फडणवीसांनी अजित पवारांबरोबर जाऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला कारण वट्याना माहित होत अजित पवार निर्दोष आहेत. भाजपने ५  वर्षे खोटे आरोप केले असल्याचे सांगत भाजपवर निशाणा साधला आहे.

Leave a Comment