हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून कोरोना रुग्णांच्या मृत्यु मध्येही वाढ होत आहे. देशातील काही राज्यात लॉकडाऊन चा निर्णय घेतला असला तरी देशात मात्र अधिकृतपणे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली नाही. दरम्यान देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील प्रमुख वैद्यकीय सल्लागार डॉक्टर अँथोनी फाऊची यांनी भारताला महत्वाचा सल्ला दिला आहे.
फाऊची यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भारतामध्ये वाढत असलेल्या कोरोनाबद्दल मोठं वक्तव्य करत देशात काही आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा असल्याचं बोलून दाखवलं. लाॅकडाऊन हा कुणालाही आवडणारा नाही, पण कोरोनाचा लढा जिंकण्यासाठी हा प्रभावी उपाय असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
भारतातील कोरोनावर उपाययोजना करताना राष्ट्रीय पातळीवर एक टास्क फोर्स सारखी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचं मत डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी व्यक्त केली आहे. डॉ. अॅन्थनी फाऊची यांच्या मते, भारतात आता तीन पातळीवर कोरोना विरोधात उपाययोजना करणे आवश्यक आहे. एक म्हणजे तात्काळ काय उपाय करता येतील. दुसरं म्हणजे येत्या एक दोन आठवड्याभरात काय उपाययोजना करता येतील आणि तिसरं म्हणजे दुसऱ्या लाटेचा कालावधी वाढू नये तसेच तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी दीर्घकालीन काय उपाययोजना करता येतील.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.