पुसेसावळी | डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंअतर्गत खटाव- माण राष्ट्रीय काँग्रेसचे नेते हरणाई उद्योग समूहाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या प्रयत्नातुन खटाव तालुक्यातील निमसोड, धोंडेवाडी, कान्हरवाडी, आदी गावातील विविध विकास कामांसाठी सुमारे 54 लाख रुपयांचा मंजूर करण्यात आला आहे.
राज्याचे समाजकल्याण राज्यमंत्री डॅा. विश्वजीत कदम यांच्या माध्यमातुन तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातुन मिळाला आहे. यामध्ये मंत्री विश्वजीत कदम यांच्या माध्यमातून भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत चालु अर्थसंकल्पात खटाव तालुक्यासाठी 50 लक्ष रुपयाच्या निधीला विकास कामांसाठी खास बाब म्हणून मंजुरी देण्यात आली आहे.
यातील संबंधित कामे मौजे निमसोड (ता. खटाव) येथील विठ्ठल मंदीर ते हनुमान मंदीर मार्गे मंगल शिवाजी तावरे यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे व बंदिस्त आर सी सी गटर बांधकाम करणे मौजे धोंडेवाडी (ता. खटाव) येथील मागासवर्गीय वस्तीतील स्मशानभुमी सुशोभीकरण करणे. मौजे धोंडेवाडी (ता. खटाव) येथील बौद्ध वस्तीतील मंदीरात २ खोल्यांचे बांधकाम करणे. मौजे कान्हरवाडी (ता. खटाव) येथे मागासवर्गीय वस्तीतील रस्ता कॅांक्रेटीकरण करणे. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून सन २०२२-२०२३ च्या अर्थ संकल्पामध्ये खटाव तालुक्यांतील राज्यमार्ग-६० ते कातरखटाव, पळसगांव, विखळे, कलेढोण पिंपरी रस्ता ते जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा-४५ भाग ढोकळवाडी फाटा ते विखळे ते विखळे फाटा या रस्ताची सुधारणा करणे.
सदरील विकास कामांच्या मंजुरीमुळे मौजे निमसोड, धोंडेवाडी, कान्हरवाडी, विखळे, कातर खटाव, पळसगाव कलेढोन आदी गावातील मागासवर्गीय समाजासह ग्रामस्थांनी लाभ होणार असल्याचे रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले.