कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील घोगाव, बामणवाडी, भुरभुशी, येवती, साळशिरंबे, कोळेवाडी या गावांना जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 4 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत मुख्य अभियंता, पुणे यांचेकडून या गावांच्या कामांना मंजुरी मिळाली होती, हि कामे कार्यान्वित करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता आवश्यक असते त्यानुसार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्राद्वारे सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठपुरावा केला होता त्याप्रमाणे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या ६ गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील घोगाव गावाला 95 लाख 46 हजार रुपये, बामणवाडी गावाला 1 कोटी 14 लाख 96 हजार रुपये, भुरभुशी गावासाठी 38 लाख 85 हजार रुपये, येवती गावासाठी 1 कोटी 18 लाख 6 हजार रुपये, साळशिरंबे गावासाठी 37 लाख 44 हजार रुपये, कोळेवाडी गावासाठी 85 लाख 40 हजार रुपये अश्या 6 गावांसाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून जवळपास 4 कोटी 90 लाख रुपये इतका भरघोस निधी मंजूर झाला असून या गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनेला सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली असून या कामांची निविदा निघाल्यानंतर हि कामे लवकरच सुरु होणार आहेत.