व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पुणे बंगळूर महामार्गावरील फर्निचर दुकानाला आग; हायवेलगत आगीचा थरार पहाण्यासाठी लोकांची गर्दी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पुणे बंगळूर महामार्गावरील फर्निचर दुकानाला गुरुवारी आग लागली. कराड जवळील मलकापूर येथील लाॅटस फर्निचर दुकानाला आग लागून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने वेळेवर पोहोचत ही आग आटोक्यात आणली आहे.

सदर आग कशी लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. या आगीचे रुप इतके भयंकर होते की हायवेलगतचा हा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यानंतर पोलिसांनी नागरिकांना घटनास्थळावरुन परतवले.

दरम्यान, आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. कराड शहराचे पोलिस अधिकारी घटनास्थली पोहोचले असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. आग आता आटोक्यात आली असून अजूनही अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरु आहे.