पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद
जुलै महीन्यातील अतिवृष्टीच्या आसमानी संकटांने अंबेनळी घाट महाबळेश्वर नजीक मेटतळे येथे वाहून गेल्यामुळे महाराष्ट्रात नंदनवन महाबळेश्वरचे दळणवळण कोकणाशी बंद झाले होते. स्थानिक आमदार मकरंद पाटील याच्या अविरत प्रयत्नातून महाबळेश्वर सार्वजनिक बाधकाम विभागाच्या कुशल नियोजनाने गॅबियन तंत्रज्ञानाचा वापर करत अंबेनळी घाट मेटतळे येथील रस्ता पुन्हा हलक्या वाहनांकरीता सुरु झाला आहे.
अंबेनळी घाटातील मेटतळे येथील रस्ता अतिवृष्टीमुळे वाहुन गेल्यामुळे महाबळेश्वरच कोकणाशी संपर्क तुटला होता. महाबळेश्वरकडे येण्याकरीता अंबेनळी घाट बंद असल्यामुळे पर्यटकांना त्याचा मोठा फटका बसला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सातारा जिल्हा अधिक्षक अभियंता यांनी मेटतळे येथे गॅबियन तंत्रज्ञान वापरुन आपत्ती व्यवस्थापनात जलद दळणवळण पुर्ववत करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मेटतळे येथे अतिवृष्टीने रस्ता वाहून गेल्याने तात्पुरती पण जलद आपत्ती व्यवस्थापन करत. दळणवळण सुरु करण्याची महत्वाची गरज अंबेनळी घाटात निकडीची होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाची उपअभियांता महेश गोजांरी यांनी पुण्याच्या पुल बांधकाम करणाऱ्या रायकॅान कपनीला पाचारण केले होते. खोलदरी, पाऊस, दुर्घटना स्थळाला लागून धबधबा अशा बिकट परिस्थितीत रस्त्यांचे काम करणे जिकीरीचे झाले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रयत्नाची पराकाष्टा करत वापरास सुरु केला आहे. अंबेनळी घाटातील रस्ता वाहुन गेल्यानतरन मेटतळे येथे कायमस्वरुपी स्लॅबड्रेन पुलाचे बांधकाम करणे गरजेचे झाले आहे. अंदाजे 2.25 कोटी रुपयांचा खर्च नवीन पुल बांधकामावर येणार आहे.