नक्षल्यांचा घातपाताचा कट गडचिरोली पोलिसांनी उधळला

गडचिरोली प्रतिनिधी । अबुझमाड जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील जवानांनी नक्षलवादी प्रशिक्षण तळ उध्दवस्त करत २ नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळविले होते. यावेळी मोठया प्रमाणावर नक्षल साहित्य तसेच दस्तऐवज हस्तगत करण्यात आले होते. मिळालेल्या दस्तऐवजावरुन काल गडचिरोली पोलिस दलाने उपविभाग भामरागड अंतर्गत येणाच्या पोमके लाहेरी हद्दीतील लाहेरी ते धोडराज रस्त्यावर शोध अभियान राबविले होते. या रस्त्यावर नक्षलवादयांनी घातपाताच्या दृष्टीने पुरुन ठेवलेले अंदाजे १५ कि. ग्रॅ. वजनाचे क्लेमोर माईन मिळुन आले.

यानंतर या ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथक, गडचिरोली यांची टीम तातडीने रवाना करण्यात आली. सदर टीमने क्लेमोर माईन घटनास्थळीच सुरक्षितरित्या निकामी करण्यात यश प्राप्त केले. यामुळे नक्षलीचा घातपाताचा डाव उधळुन लावण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे. याबाबत उपपोस्टे लाहेरी येथे गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे तसेच सर्चिंग करुन क्लेमोर माईन शोधुन काढणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले आहे. तसेच या दोन्ही पथकाला पारितोषिक घोषित केले आहे.

You might also like