Tuesday, January 7, 2025

Gaiola Island : रहस्यमयी नेत्रदीपक बेटाची थरारक गोष्ट; मोहात पडला त्याचा खेळ झाला खल्लास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gaiola Island) संपूर्ण जगभरात अनेक सुंदर गोष्टी आहेत आणि सुंदर गोष्टी या नेहमीच आकर्षक असतात. अनेकदा आकर्षून घेणाऱ्या या गोष्टी स्वतःतच एक रहस्य असतात. आपल्या आसपास अशा बऱ्याच गोष्टी असतात. ज्यांचे बाहेरचे सौंदर्य हे फारच मोहक असते. मात्र या वस्तू, वास्तू किंवा ठिकाण अत्यंत भयानक आणि थक्क करणारी परिस्थिती निर्माण करू शकतात.

जगभरात अशी अनेक ठिकाण आहेत. ज्यांचे सौंदर्य डोळ्यात साठवून घ्यावेसे वाटते. इतकेच काय तर इथे रमून जावेसे वाटते. मात्र अशाच एका सुंदर बेटाचं रहस्य आजपर्यंत कुणालाच उलगडलेलं नाही. (Gaiola Island) अत्यंत सुंदर आणि निळाशार समुद्र लाभलेलं हे एक असं बेट आहे, ज्याला ‘शापित बेट’ म्हणून ओळखले जाते. जो जो या शापित बेटाच्या प्रेमात वा मोहात पडला तो तो जीवानिशी गेल्याची या बेटाची थरारक गोष्ट आहे. या बेटाविषयी अनेक लोककथा प्रसिद्ध आहेत. ज्या या बेटाविषयी विविध गोष्टी पसरवत आहेत. चला तर जाणून घेऊया या शापित बेटाविषयी अधिक माहिती.

कुठे आहे हे शापित भेट? (Gaiola Island)

इटलीच्या नैऋत्येस नेपल्सच्या आखातात ‘गाइउला’ नावाचे हे बेट आहे. अत्यंत सुंदर आणि मोहक असे हे बेट कोणालाही सहज प्रेमात पाडेल. स्वच्छ आणि निळ्या समुद्रातील अनेक सुंदर बेटांपैकी हे एक बेट आहे. ज्याच्या मागे एक मोठा इतिहास आहे. लोक कथांनी या बेटाला ‘शापित बेट’ अशी ओळख दिली आहे. असं म्हटलं जातं की, या बेटाचा जो कोणी मालक होतो त्याला दुर्दैवाने एक तर स्वतःचा जीव गमवावा लागतो किंवा नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो. आतापर्यंत या बेटाची मालकी ज्याने ज्याने घेतली त्याच्या आयुष्याला ब्रेक लागला आहे.

जो जो मालक झाला तो तो जीवानिशी गेला

इटलीतील ‘गाइउला’ बेटाचा पहिला मालक लुइगी नेग्री होता. (Gaiola Island) ज्याने १८०० च्या उत्तरार्धात हे बेट विकत घेतले आणि त्यावर एक सुंदर आणि भव्य असा व्हिला बांधला होता. हा व्हिला आजही बेटावर उभा आहे. मात्र हे बेट विकत घेतल्यानंतर नेग्रीने त्याची संपूर्ण संपत्ती गमावली आणि तो कंगाल झाला.

नेग्रीनंतर १९११ मध्ये जहाज कॅप्टन गॅस्पेरे अल्बेंगा यांनी हे बेट खरेदी करण्यामध्ये रस दाखवला. मात्र केवळ स्वारस्य व्यक्त केले आणि त्यांचे जहाज क्रॅश झाले. या अपघातात कॅप्टन गॅस्पेरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Gaiola Island) यानंतर बेटाचा पुढील मालक फारच श्रीमंत होता. त्याचे नाव हान्स ब्रॉन असे होते. तो एक स्विस इसम होता. ज्याने १९२० च्या दशकात हे बेट विकत घेतले. धक्कादायक बब अशी की, हे बेत विकत घेतल्यानंतर काही वेळातच तो मृतावस्थेत सापडला. इतकंच नव्हे तर काही काळानंतर त्याच्या पत्नीचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.

हे मृत्यू चक्र इथेच थांबलं नव्हतं. तर या बेटाच्या पुढील मालकांसोबत देखील असेच प्रकार घडत होते. या बेटाचा पुढचा मालक ओटो ग्रुनबॅच होता. ओटो ग्रुनबॅच हा या बेटावरील व्हिलामध्ये वास्तव्यास होता. ज्याने बेटाची मालकी घेतल्यानंतर काही काळातच त्याला हृदय विकाराचा झटका आला आणि यात त्याचा मृत्यू झाला. (Gaiola Island) पुढे काही वर्ष सरल्यानंतर या बेटाची मालकी मॉरिस- यवेस सँडोजने घेतली. हा एक फ्रेंच औषध उद्योगपती होता. या मृत्युचक्राला तोसुद्धा बळी गेला. १९५८ साली त्याला मानसिक अस्थैर्यामुळे स्वित्झर्लंडच्या मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच रुग्णालयात त्याने आत्महत्या करून स्वतःला संपवलं.

आता या बेटाची भूक वाढली होती. जो जो मालकी हक्क घेत त्याला हे बेट संपवत होतं. पुढे या बेटाला आणखी एक नवा मालक मिळाला. जर्मन पोलाद उद्योगपती बॅरन कार्ल पॉल लँगहेम यांनी हे बेट खरेदी केले. मात्र हे बेट खरेदी करताच लँगहॅम यांचा व्यवसाय दिवाळखोर झाला. (Gaiola Island) नुकसान लक्षात घेऊन त्यांनी हे बेट फियाट ऑटोमोबाईल्सचे मालक जियानी ॲग्नेली यांना विकले. एका वृत्तानुसार, हे बेट विकत घेतल्यानंतर जियानी अग्नेली यांना दुर्दैवाने अनेक अपघातांना सामोरे जावे लागले होते.

यानंतर मात्र हे बेट बिनमालक राहिले. बेटाविषयी विविधगोष्टी पसरल्या आणि त्यानंतर कुणीच बेटाची मालकी घेण्यात स्वारस्य दाखवले नाही. प्रत्येकाला आपापल्या जीवाची पर्वा वाटू लागली आणि तेव्हापासून हे बेट ‘शापित बेट’ म्हणून ओळखले जाऊ लागले. येथील स्थानिक लोक आजही बेटाच्या मालकांसोबत घडलेले प्रकार विविध गोष्टींच्या स्वरूपात सांगतात. त्यामुळे या बेटाविषयी विविध कथा प्रचलित आहेत आणि या बेटाविषयीचे रहस्य आणखीच खोल वाटू लागले आहे. (Gaiola Island)