Tuesday, January 7, 2025

Gallstones | पित्ताशयातील खडे कशामुळे होतात ? जाणून घ्या कारणे आणि उपचार

Gallstones | आजकाल पित्ताशयातील खडे ही एक सामान्य समस्या बनत चाललेली आहे. जगातील कितीतरी लोकांना ही समस्या उद्भवत असते. या स्थितीमध्ये तुमच्या पित्ताशयामध्ये लहान आकाराचे काही खडे तयार होतात. ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास देखील होतो. परंतु याबाबत अनेक गैरसमज देखील आहे. पित्त आणि मूत्राशया हा तुमच्या यकृताखालील एका अवयव आहे. ज्यामध्ये पित्त साठवले जाते आणि सोडले देखील जाते. पित्ताचे खडे (Gallstones) आणि किडनी स्टोन हे खूप वेगळे असतात. हे खडे कॅल्शियमऐवजी कोलेस्ट्रॉलपासून बनले जातात. त्यामुळे त्यांची लक्षणे देखील वेगळी असतात. त्याला पित्ताशयाचा खडा असे म्हणतात पित्ताच्या आत असलेले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असल्याने पित्ताक्षराचे प्रमाण कमी असते.

पित्तामध्ये कोलेस्ट्रॉल आणि इतरही रासायनिक द्रव्य असतात. या सगळ्यांमध्ये जेव्हा असमतोल निर्माण होतो. तेव्हा पित्ताशयाचे खडे तयार होतात. बहुतेक वेळा पित्तामधील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, तेव्हा हे खडे तयार होतात.

पित्ताशयातील खड्यांची लक्षणे | Gallstones

पित्ताशयामध्ये खडे तयार झाले की, पोटात तीव्र वेदना होतात. त्याचप्रमाणे पोटातून डाव्या खांद्याकडे आणि पाठीकडे ह्या वेदना जातात. जेवल्यानंतर जेव्हा तुम्ही चरबीयुक्त पदार्थ म्हणजे असतील तूप असे पदार्थ खाता. तेव्हा या वेदना जास्त वाढतात पोटात टोचल्यासारखे वाटते. जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेता, तेव्हा देखील वेदना होतात. पित्ताशयाच्या खड्यांमुळे छातीत दुखणे, छातीत जळजळ होणे, अपचन होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, उलट्या, ताप, मळमळ यांसारखी लक्षणे दिसतात.

पित्ताशयातील खड्याची कारणे

जेव्हा शरीरात गरजेपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल निर्माण होते. तेव्हा ते अतिरिक्त कोलेस्ट्रॉल क्रिस्टल होते आणि पुढे जाऊन त्याचे खडे तयार होतात.

जोखमीचे घटक कोणते ? | Gallstones

ज्या व्यक्तीचे वय 40 पेक्षा जास्त आहे. त्यांना पित्ताशयाच्या खड्यांचा जास्त धोका उद्भवतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांना पित्ताशयातील खड्यांची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे अतिरिक्त लठ्ठपणा असलेल्या व्यक्तीला देखील पित्ताशयाच्या खड्यांचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही जर जास्त चरबीयुक्त जेवण, उच्च कोलेस्ट्रॉलचे जेवण खात असाल, तरी देखील पित्ताशयातील खड्यांची निर्मिती होते. तसेच मधुमेह, यकृत्याचे आजार आणि रक्त विकार असणाऱ्या व्यक्तींना देखील पित्ताशयाचे खडे होतात.

यावर उपचार काय ?

हे कोलेस्ट्रॉलचे खडे विरघळण्यासाठी काही ठराविक औषधे देखील दिली जातात. परंतु ही औषधे दरवेळी प्रभावी ठरतील, याची खात्री नाही. त्याचप्रमाणे पित्ताशयातील खड्यांसाठी सगळ्यात सामान्य उपचार म्हणजे पित्ताशयाची शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठी पित्ताशय काढून टाकने हाच एक पर्याय असतो.