Thursday, March 30, 2023

कराडमध्ये मटका खुलेआम सुरुच, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वीनी सातपुते लक्ष घालणार का?

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड शहरातील विविध समाजातील कुटुंबातील ग्रामस्थांनी व विविध राजकीय पक्षातील व्यक्तींनी, विविध संघटनांनी वेळोवेळी अवैद्य विनापरवाना मटका धंदा बंद व्हावा म्हणून निवेदने, उपोषणे करूनही पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यांसाठी आज कराड मध्ये विविध संघटना च्या वतीने मटका बंद व्हावा यासाठी तहसीलदार कचेरी समोर उपोषण सुरू.

- Advertisement -

कराड शहरात गेले काही दिवस बंद असलेला अवैद्य मटका व्यवसाय पुन्हा जोमात सुरू झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत यासंदर्भात शहरातील विविध सामाजिक संस्था विविध संघटनांनी प्रशासनास वारंवार लेखी निवेदन देऊनही मटका व्यवसाय फोफावत चालला आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कराड दक्षिण तालुका अध्यक्ष अमोल कांबळे व गोरख शिंदे अवैद्य मटका व्यवसायाच्या विरोधात उपोषणास बसले आहेत.

समाजातील गोरगरीब कष्टकरी मध्यमवर्गीय कुटुंबाचे मटका धंद्यातून आर्थिक नुकसान करून , समाजातील कुटुंबांना देशोधडीला लावण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे . मटका धंदा रोजगार नाही काही विदूशाटी मटका बुकी चालूवून ,मटका धंद्याचे दुकाने थाटून तुंबड्या भरून मिळवलेल्या पैशांतून संपत्ती मोज मज्या, आराम ब्रँडेड कपडे, गाड्या फोन यासाठी खर्च करून गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या मध्यमवर्गीयांच्या पैशावर राजरोसपणे दरोडा टाकण्याचे काम आजपर्यंत सुरू करत असल्याची प्रतिक्रिया गोरख शिंदे यांनी दिली.

कालपर्यंत अगदी फुटकळ असलेले मटकामालक आज लाखोपती झालेत. लोकांना ओपन क्‍लोजच्या आशेवर बसवायचे व त्यांच्या खिशातील पैसे काढून आपले खिसे भरायचे हे त्यांचे कर्तृत्व. हे करताना हप्त्याच्या जोरावर सर्व यंत्रणांना गप्प बसवायचे हे त्यांचे कौशल्य. नैतिकदृष्ट्या समाजात शून्य किंमत; पण जणू काही हे फार महत्त्वाचे गुन्हेगार असल्यासारखे रोज त्यांची चर्चा चालू आहे. त्यांना हद्दपार कसे करायचे, यासाठी डोक्‍याला डोकी लावून अधिकारी बसले आहेत. वास्तविक या मटकामालकांना जेरीस आणायचेच ठरवले तर पोलिसांना तासाभराचा अवधी पुरेसा आहे; पण मटका बंदबरोबरच हप्ता बंद झाला नाही तर मटकामालक कधीच हद्दपार होणार नाही, अशी जिल्ह्यातील स्थिती आहे. त्यामुळे पहिल्यांदा हप्ता बंद मग तासाभरात मटका बंद करणे शक्‍य आहे. जिल्ह्यातले सर्व पोलिस अजिबात नाही; पण ठराविक पोलिसांना, काही अधिकाऱ्यांना मटक्‍याची, त्याच्या मालकांची, त्यांच्या अड्ड्याची नस आणि नस माहीत आहे. त्यांच्यावरच मटका बंदची जबाबदारी देण्याची गरज आहे. कारण या ठराविकांनीच मटका बंद करायचे ‘मनावर’ घेतले तर मटका बंद होणार आहे.

पण आज स्थिती अशी आहे, की मटका मालक टीव्ही चॅनेलवर पुढे येऊन, कोण किती हप्ता घेतो, हे जाहीर सांगत आहेत. मटका बंद राहूदेच पण त्या मटकामालकाला ‘तू असे बोलू नको’ असे सांगायचे नैतिक धाडस पोलिसांत उरलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. ठराविक पोलिस व काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे ही परिस्थिती आली आहे आणि आता चक्क फुटकळ मटकामालकांना हद्दपार करायच्या कारवाईसाठी विशेष पोलीस यंत्रणा बैठका घेणार .

जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ठरवले तर कराड सह जिल्ह्यातील मटका बंद होऊ शकतो.पण मटकामालक फक्त पैशावर मोठे आहेत; कारण अनेकांना मटक्‍याचा नाद लावून त्यांनी मोठी कमाई केली आहे. १०० पैकी ९० लोक ज्या आकड्यावर पैसे लावतात तो आकडा कधीच येत नाही, हे मटक्‍याचे उघड रहस्य आहे. त्यामुळे ८० रुपये मटकेवाल्याच्या खिशात व २० रुपयांत इतर कारभार असा व्यवहार आहे. त्यामुळे रोज मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या या पैशातून सर्व यंत्रणातील काही घटकांना विकत घेतले गेले असल्यासारखी स्थिती आहे. याशिवाय आपले ‘वजन’ वाढवण्यासाठी या मटकावाल्यांनी काही तालमींना देणगीचा रतिब लावला आहे.

त्यामुळे वरवर मोठे झालेले हे मटकावाले कारवाईला घाबरत नाहीत. आज अटक म्हणून त्याचा वृत्तपत्रात फोटो येतो, त्याच सकाळी तो मटकावाला नेहमीप्रमाणे शहरात फिरत असतो. पोलिसांची भीती हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही. म्हणूनच त्यांची मिजास वाढली आहे .पोलीस प्रशासन यांना मटका बंदच करायचा असेल तर त्यांना केवळ तासाभरात ते शक्‍य आहे. फक्त कारवाई सुरू होईपर्यंत त्यांच्या खबऱ्यापर्यंत यातला एक शब्द बाहेर जाणार नाही, हे पाहणे गरजेचे आहे. कारण मटकेवाल्यांचे खबरे पोलिसांत नाहीत हे म्हणने,धाडसाचे होणार आहे.
पण जिल्हा पोलीस प्रशासन याकडे लक्ष घालणार का ?.असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.