नववर्षानिमित्त सचिननं ट्विटवर शेअर केला दिव्यांग खेळाडूचा प्रेरणादायी व्हिडीओ;नेटकरी भारावले

नवीन वर्षाच्या सुरुवातीला वेगवेगळे संकल्प लोक करत असतात. हे संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक असलेली प्रेरणा कधी कुटुंबियांकडून, कधी मित्रांकडून तर कधी समाजमाध्यमांवरून मिळत असते. संकल्प तडीस नेण्याच्या दृष्टीनं असाच एक प्रेरणा देणारा विडिओ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सोशल मीडियावर एक भावूक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

परतवाड्यात सायकल रॅली काढून नवीन वर्षाचं स्वागत; स्वस्थ आरोग्य ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन

अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा येथे नवीन वर्षाचं स्वागत सायकल रॅलीद्वारे करण्यात आले. यावेळी शहरातील परतवाडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सदानंद मानकर यांनी जयस्तंभ चौक ते अष्टमहासिद्धी पर्यंत पोलिस अधिकारी, शासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सायकल चालवून आपले व इतरांचे आरोग्य स्वस्थ ठेवत नवीन वर्षी भरगोस सायकल चालवा असा संदेश दिला.

2020 मध्ये ऑलिम्पिकशिवाय काय काय बघणार?

#HappyNewYear2020 | क्रीडाजगतासाठी 2020 हे अतिशय महत्त्वाचे वर्ष आहे कारण टोकियो आॉलिम्पिक आणि पॕरालिम्पिकसारखा भूतलावरील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव यंदा होणार आहे. याशिवाय टी-20 क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धा, फूटबॉलची युरो कप स्पर्धां, गोल्फची रायडर कप स्पर्धा हे यंदाचे आकर्षण ठरणार आहे. 2020 मध्ये क्रीडाजगतात काय काय होणार आहे हे बघू या…. जानेवारी- 1 जानेवारी- डार्टसच्या विश्व … Read more

धक्कादायक! गौतम गंभीरला कुटुंबासह ठार मारण्याची धमकी

दिल्ली | माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोनद्वारे धमकी देण्यात आल्याची माहिती गंभीर याने माध्यमांना दिली आहे. धमकी प्रकरणी गंभीरने दिल्ली पोलिसांत तक्रार केली असून आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी त्याने केली आहे. गौतम गंभीर क्रिकेटसह विविध मुद्द्यांवर … Read more

सना लहान आहे, तिला अशा प्रकरणापासून दूर ठेवा; सना गांगुलीची पोस्ट व्हायरल

सना गांगुलीने खुशवंत सिंह यांच्या ‘द एंड आफ इंडिया’ या पुस्तकातील काही भाग शेअर करुन देशातील सद्यपरिस्थितीवर भाष्य केलं आहे.

रिषभ पंतमुळे संजू सॅमसनची कारकीर्द खराब होणार आहे का?

अशा परिस्थितीत रिषभ पंतच्या जागी टीम मॅनेजमेंट संजू सॅमसनला संधी देणे योग्य नाही की नाही, असा प्रश्न निर्माण होतो की खराब कामगिरी असूनही पंतचे संघात स्थान निश्चित आहे. आम्ही हे सांगत नाही कारण आमची पंतशी वैमनस्य आहे आणि सॅमसनशी सहानुभूती आहे.

खो-खो स्पर्धेच्या निकालावरून शिक्षकासह केंद्रप्रमुखाला मारहाण

जिल्ह्यातील बिटस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेअंतर्गत खोखो खेळादरम्यान निकालावरून झालेल्या वादात धामणगावामध्ये मास्तरासह केंद्रप्रमुखाला धारेवर धरीत मारहाण करण्यात आली. गोंडपिपरी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.याप्रकारानंतर बराच काळ परिसरात गावक-यांनी गर्दी केली. शेवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आता पोलीस सरंक्षणात खेळ खेळविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
       

कोल्हापूरचे साहिल चौहान ठरले पहिले शाकाहारी ‘आयर्नमॅन’

कोल्हापूरच्या एस. बी. चौहान स्टीलचे साहिल सुरेश चौहान हे या वर्षीचे ‘आयर्न मॅन’ ठरले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या २२६ किमीच्या या स्पर्धेत जगातील हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. चौहान यांच्या या विजयाने कोल्हापूरच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण शाकाहारी असलेले चौहान हे ही स्पर्धा पूर्ण करणारे एकमेव ठरले आहेत.

अमरावतीत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे, मिरॅकल फाउंडेशनचा उपक्रम

दिवसेंदिवस महिला अत्याचार बलात्काराच्या घटना वाढत आहेत.अनेकवेळा एकटेपणाचा फायदा घेऊन मुलींवर अतिप्रसंग येतात. अशा परिस्थितीत मुलींना बाल वयातच स्वसंरक्षणाचे धडे देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मिरॅकल हार्ट फाउंडेशन अमरावतीच्यावतीने. मुलींच्या संरक्षणासाठी एक चर्चा सत्र आणि सेल्फ डिफेन्स कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.

चेन्नई-जमशेदपूर सामना बरोबरीत

इसाक वैनमलसावमा याने शेवटच्या क्षणी केलेल्या गोलाच्या जोरावर जमशेदपूरने इंडियन सुपर लीगच्या सहाव्या सत्रात घरच्या मैदानावर विजयाची मालिका कायम राखत सोमवारी चेन्नई एफसीला १-१ ने बरोबरीत रोखले.