आधी देश, नंतर IPL चा विचार करु! रोहितचा चहलला सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा फटका सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धांना बसला आहे. जगातील सर्वात मोठी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. भारताचा विचार करता भारतातील सर्वात लोकप्रिय क्रीडा स्पर्धा आयपीएल येत्या २९ मार्चपासून सुरु होणारी होती. मात्र, करोनाच्या संकटामुळं बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाला रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे यंदा आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या आयोजनावर करोनाची टांगती तलवार आहे. दरम्यान, भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटवर रोहित शर्माला आयपीएलच्या भवितव्याबद्दल प्रश्न विचारला यावर उत्तर देताना रोहितने चहलला महत्वाचा सल्ला दिला आहे.

”माझ्या मते आपण सर्वात आधी देशाचा विचार करायला हवा. सर्वात आधी परिस्थिती नियंत्रणात येणं गरजेचं आहे, त्यानंतर आपण आयपीएलबद्दल बोलू शकतो.” रोहितने आयपीएलच्या भवितव्याबद्दल आपलं मत मांडलं. देशभरात सध्या करोनाचे अनेक रुग्ण सापडले आहेत. वैद्यकीय यंत्रणा त्यांच्यावर उपचार करत आहेत. राज्यात मुंबई, पुणे यासारख्या महत्वाच्या शहरांमध्येही करोनाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment