महिलेच्या हस्ते ‘ श्रीं ‘ ची आरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | सुनिल शेवरे

गणेशोत्सवात विविध उपक्रम राबविणाऱ्या अष्टविनायक मंडळाने श्रीं च्या आरतीचा मान महिलेला देऊन सामाजिक समानतेचा आदर्श घडवला. आंबेगाव पठार इथे असलेल्या या मंडळाने गणेशोत्सव काळातच नव्हे तर इतर सणांतही सामाजिक उपक्रम राबविले आहेत. केरळ च्या आपत्तीग्रस्त नागरिकांना धान्याची जीवनावश्यक वस्तुंची मदत केली.

पुणे महापालिकेच्या अनेक स्पर्धांच्या पारितोषिकांचे मानकरी अष्टविनायक मंडळ ठरले आहे. ‘श्रीं ‘ च्या आरतीवेळी जयश्री पवार, सुनिता रेणुसे, राधा काशिद, आशा दीक्षित, संजोनीं काप उपस्थित होते.

Leave a Comment