हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा येत्या ७ तारखेला आपल्या घरी येणार आहे. प्रत्येक वर्षी सर्वजण आतुरतेने गणरायाची (Ganesh Chaturthi 2024) वाट बघत असतात. काही जणांच्या घरी ११ दिवसांचा गणपती असतो, तर काहींच्या घरी दीड किंवा ५ दिवसांच्या गणपतीची स्थापना केली जाते. असे मानले जाते की जर एखाद्या भक्ताने श्रीगणेशाची खऱ्या मनाने पूजा केली तर त्याच्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव आणि यश निश्चितच येते. तर आपल्यावर आलेल्या संर्व संकटावर गणपती बाप्पा मात करतो. मात्र गणपती घरात असताना काही गोष्टींची काळजी घेणं सुद्धा आवश्यक आहे. चला तर मग हे नियम काय आहेत ते जाणून घेऊया.
गणपतीची मूर्ती घरी आणत असताना नेहमी व्यवस्थित घरी आणावी, गणपती बापाच्या मूर्तीला कुठेही तडा जाणार नाही , ती मूर्ती दुखावली जाणार नाही याची काळजी घ्यावी. कारण देवदेवतांच्या तुटलेल्या मूर्ती मंदिरात ठेवल्या जात नाहीत. तो अपशकुन मानला जातो.
गणपतीची मूर्ती (Ganesh Chaturthi 2024) घेत असताना बाप्पाच्या अंगावर लाल रंगाचा कपडा परिधान करावा, कारण गणरायाला लाल रंग खूप आवडतो.
जेव्हा तुम्ही तुमच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना कराल तेव्हा तुमचं घर व्यवस्थित साफ करा, किंवा त्याठिकाणी गंगाजल शिंपडा.असं म्हंटल जाते कि जिथे घाण आणि अस्वच्छ वातावरण आहे अशाठिकाणी देवी-देवता वास करत नाहीत. त्यामुळे घराची साफसफाई करा.
गणरायाची मूर्ती बसवताना शुभ दिशा कोणती ते आधी पहा आणि मगच त्यानुसार गणरायाची स्थापना करा. गणपतीचे तोंड हे घराच्या शुभ दिशेला असावे. खास करून घराच्या उत्तर दिशेला श्रीगणेशाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. तसेच गणपती बाप्पाचे मुख घराच्या प्रवेशद्वाराकडे असावे असेही म्हंटल जाते.
यासोबतच श्रीगणेशाच्या मूर्तीच्या पूर्व दिशेला कलश ठेवा आणि दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावा.
गणेश स्थापनेची योग्य वेळ कोणती? Ganesh Chaturthi 2024
गणेश स्थापनेची योग्य वेळ कोणते हे जाणून घेणं सर्वात महत्वाचे आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो कि, ७ सप्टेंबर रोजी दुपारपासून बाप्पाची मूर्ती घरोघरी आणू शकता. त्याचा शुभ योग सकाळी 11:03 पासून सुरू होईल आणि दुपारी 01:34 पर्यंत राहील. याचा अर्थ 2024 मध्ये गणपतीची मूर्ती स्थापनेसाठी अडीच तास (150 मिनिटे) शुभ मुहूर्त आहे. त्याकाळात तुम्ही गणरायाला घरी आणून त्याची स्थापना करू शकता.