‘पर्यावरण पूरक व डॉल्बीडीजे मुक्त’ गणेशोत्सव साजरा करा – विश्वास नांगरे-पाटील

0
55
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी । ‘मला डीजे नको, प्रत्येक चौकात सीसीटीवी कॅमेरा हवेत’ अशा प्रबोधनपर घोषवाक्यासह नाशिक पोलीस दल यंदा भर देत आहे. नागरिकांना ‘पर्यावरण पूरक व डीजेडॉल्बी मुक्त’ गणेश उत्सव साजरा करण्याबाबत तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज लावण्याबाबतचे आवाहन नागरिकांना तसेच मंडळाचे सदस्य यांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले.

गंगापूर पोलीस स्टेशन नाशिक शहर यांनी प्रसाद मंगल कार्यालय येथे काल मोहल्ला कमिटीची बैठक आयोजित केली होती. यावेळी उपस्थित नागरिक तसेच मंडळाचे सदस्य यांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मार्गदर्शन केले. आयुक्त नांगरे पाटील यांचे हस्ते हर्षा सिसोदिया व लत यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आमदार सिमाताई हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त जाधव , मंगल सिंग सूर्यवंशी , गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंचल मुदगल व नगरसेवक श्रीमती गांगुर्डे व आहेर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here