Ganesh Festival Train Reservation : कोकणवासीयांनो, गणपती स्पेशल ट्रेनसाठी ‘या’ तारखेपासून Reservation सुरु

Ganesh Festival Train Reservation
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganesh Festival Train Reservation । गणपतीचा सण म्हणजे कोकणी माणसाचा आवडता सण… मुंबई- पुण्यातील कोकणी चाकरमानी एकवेळ दिवाळीला मूळ गावी म्हणजेत कोकणात जायच टाळेल, पण गणेशोत्सवाच्या काळात तो कोकणात जाणार म्हणजे जाणारच… या वर्षी गणेशोत्सव 27 ऑगस्टलाच आला आहे. यंदा गणेशोत्सव लवकर आल्याने प्रवाशांना आता चिंता लागून राहिलेये ती ट्रेनच्या तिकीटांची…परंतु कोकणवासीयांसाठी रेल्वेने दरवर्षीप्रमाणे या वेळीही गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 23 जूनपासून या गाड्यांच्या तिकिटासाठीचे रिजर्वेशन म्हणजेच आरक्षण सुरु होणार आहे.

आगाऊ आरक्षणाच्या तारखा जाहीर – Ganesh Festival Train Reservation

दरवर्षी हजारो चाकरमानी गणेशोत्वाच्या काळात मूळ गावी कोकणात जात असतात. खास करून रत्नागिरी सिंधुदुर्गात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यंदा 27 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे तर 6 सप्टेंबर रोजी गणपतीचे विसर्जन होणार आहे. अनेक चाकरमानी हे 5-7 दिवसांच्या गणपती उत्सवासाठी गावी जात असतात. यंदा गणेशोत्सव लवकर येत असल्याने, कोकण रेल्वेने दरवर्षीप्रमाणे या वेळीही गणपती विशेष गाड्या (Ganesh Festival Train Reservation) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांचे आरक्षण २३ जूनपासून सुरू होईल. म्हणजेच काय तर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ६० दिवस आधीच गाड्यांचे रिजर्वेशन करावं लागणार आहे. आगाऊ आरक्षणाच्या तारखांचा तक्ता कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केला आहे.

मुंबई – गोवा महामार्गाचे काम अजूनही रखडले असल्याने कोकणात जाणारा प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतो. परिणामी रेल्वेची गर्दी वाढते. कोकणात प्रवास करणाऱ्यांची मागणी जास्त असल्याने, मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर २५० हून अधिक गणपती विशेष गाड्या चालवते खरी, मात्र तरीही गर्दी हि वाढतच जात असते. चाकरमान्यांची संख्या इतकी जास्त असते की रेल्वेचे तिकीट मिळणे खूप अवघड होऊन जाते. यामुळेच कोकण रेल्वे प्रशासनाने ६० दिवस आधीच आगाऊ आरक्षण वेळापत्रक जाहीर केले आहे. Ganesh Festival Train Reservation

आरक्षण दिनांक – प्रवासाचा दिनांक

२३ जून, सोमवार – २२ ऑगस्ट, शुक्रवार

२४ जून, मंगळवार – २३ ऑगस्ट, शनिवार

२५ जून, बुधवार – २४ ऑगस्ट, रविवार

२६ जून, गुरुवार – २५ ऑगस्ट, सोमवार

२७ जून,शुक्रवार – २६ ऑगस्ट, मंगळवार – हरितालिका

२८ जून, शनिवार – २७ ऑगस्ट, बुधवार – श्री.गणेश चतुर्थी

२९ जून, रविवार – २८ ऑगस्ट, गुरुवार – ऋषी पंचमी

३० जून, सोमवार – २९ ऑगस्ट, शुक्रवार

०१ जुलै, मंगळवार – ३० ऑगस्ट, शनिवार

०२ जुलै, बुधवार – ३१ ऑगस्ट, रविवार – गौरी आगमन

०३ जुलै, गुरुवार – ०१ सप्टेंबर, सोमवार – गौरी पूजन

०४ जुलै,शुक्रवार- ०२ सप्टेंबर,मंगळवार – गौरी गणपती