हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवी मुंबईचे नेते आणि भाजप आमदार गणेश नाईक यांच्या नातवाला म्हणजेच संकल्प संजीव नाईक याना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिघांचा शोध सुरु आहे. माळशेज घाटाच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला आहे.
संकल्प संजीव नाईक (Sankalp Sanjeev Naik) व त्यांचे मित्र तेजेंद्रसिंग हरजितसिंह मंत्री हे दोघे कृषी केंद्र शोधण्यासाठी माळशेज घाटाच्या दिशेने जात होते. तळवली गावाजवळ आले असता तेथून त्यांनी गाडी पुन्हा मागे फिरवली. त्याचवेळी पाठीमागून आलेला दुचाकीस्वार धडकला. दरम्यान, तेथे असलेल्या नीलेश देसले व त्याच्या तीन साथीदारांनी संकल्प, तेजेंद्रसिंग यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
दुचाकीने धडक दिल्यावर नाईक व त्यांचा मित्र गाडीतून खाली उतरले व दुचाकीस्वाराला उचलले. त्याचे नाव विचारले असता त्यांनी प्रवीण रघुनाथ लिहे असे नाव सांगितले. हनुमान हॉटेल जवळ नीलेश व तीन साथीदारांनी मारहाण केली.
याप्रकरणी निलेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इतर तिघांचा शोध सुरु आहे. याबाबत टोकावडे पोलीस ठाण्यात 108/2021 भदविस कलम 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेत तेजेंद्रसिंग यांच्या गळ्यातील सव्वा तोळ्याची सोन्याची चेन गहाळ झाली
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा