Ganesh Puja | गणेशोत्सव हा भारतातील सणांपैकी एक सगळ्यात मोठा सण आहे. हा सण गावापासून ते शहरांपर्यंत मोठ्या जल्लोषात आणि आनंदाने साजरा करतात. यावर्षी गणेश चतुर्थी हा सण 7 सप्टेंबर 2024 रोजी येत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक गणपतीच्या मूर्तीची घरात स्थापना करतात. तसेच जितके दिवस गणपती आपल्या घरी असतो. तितक्या दिवस मनोभावे पूजा (Ganesh Puja) करतात. अगदी प्रत्येकाच्या घरात ते चौका चौकात देखील आपल्याला गणपती पाहायला मिळतात. शहरांमध्ये गणपतीचे (Ganesh Puja) देखावे पाहायला मिळतात. संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात हा सण साजरा केला जातो. सगळेजण या दिवसात आपले काम, आपले टेन्शन सगळे बाजूला ठेवून गणपतीच्या आराधनेमध्ये तल्लीन होऊन जातात. पुरातन काळापासूनच भारतामध्ये या गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक सण आणि उत्सव हा भारतात मोठ्या जल्लोशात साजरा केला जातो. पुराणानुसार या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता. त्यामुळेच या गणेश चतुर्थीच्या दिवशी सगळेजण बाप्पाची मूर्ती घरात स्थापन करतात आणि मनोभावे पूजा करतात.
गणपती हे संपूर्ण भारताच्या आराध्य दैवत आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही आपण गणपती पूजन करून करतो. असे म्हणतात की गणेशाची (Ganesh Puja) उपासना केल्याने ज्ञान, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. परंतु ही उपासना करताना तुम्हाला काही नियम पाळणे देखील खूप गरजेचे असते. आता गणपतीची पूजा करताना नेमकी कोणती पद्धत वापरावी? हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या शास्त्रामध्ये गणपती पूजनाला खूप महत्त्व आहे. अशा काही गोष्टी आहे ज्याच्याशिवाय गणपतीची पूजा पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही जर या सगळ्या गोष्टींचे पालन करून गणपतीची पूजा केली, तर नक्कीच ती पूजा गणपतीपर्यंत पोहोचते असे म्हणतात. आता गणपतीची प्राणप्रतिष्ठा करताना कोणत्या गोष्टींची गरज असते हे आपण जाणून घेऊया.
गणपतीची मूर्ती आणणे | Ganesh Puja
सगळ्यात आधी आपल्याला गणपतीची मूर्ती आणायची आहे. परंतु गणपती काही दिवसांनी विसर्जन करायचे आहे. त्यामुळे तुम्ही इको फ्रेंडली मूर्ती आणू शकता. म्हणजेच विसर्जनानंतर पर्यावरणाला यापासून कोणतीही इजा होणार नाही.
चौरंग किंवा पाट
तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करण्यासाठी चौरंग किंवा पाठाचा वापर करू शकता गणपती बाप्पाची मूर्ती कधीही जमिनीवर ठेवू नये. बाप्पाचे स्थान नेहमी वर असावे. यासाठी तुम्हाला स्वच्छ जागा निवडावी लागेल आणि त्यावर चौरंग मांडून बाप्पाची स्थापना करावी लागेल.
कलश आणि नारळ
गणपती बाप्पाची पूजा करताना कलश आणि नारळ खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही मूर्तीचे स्थापना केल्यानंतर मूर्ती जवळ हा कलश ठेवू शकता. आणि त्यावर नारळ ठेवा तसेच त्यात आंब्याची पाने देखील ठेवा.
लाल कापड
बापाच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी लाल रंगाचे कापड खूप महत्त्वाचे आहे. पूजेमध्ये लाल कापडाचे खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना हे लाल वस्त्र तुम्ही बाप्पाच्या खाली ठेवू शकता.
मुळ्याची पाने
गणपती बाप्पाला विशेषता मुळ्याची पाणी अर्पण करतात. बापाला ही पाने खूप प्रिय असतात. त्यामुळे बाप्पा प्रसन्न होतो असे मानले जाते. त्यामुळे तुम्ही पूजा करताना जर मुळ्याची पाणी आणली, तर तुमची पूजा नक्कीच सफल होईल.
पंचामृत आणि मोदक
गणपती बाप्पाला खायला अनेक पदार्थ आवडतात. परंतु त्यातील पंचामृत आणि मोदक हे गणपती बाप्पाचे सगळ्यात आवडते पदार्थ आहे. त्यामुळे तुम्ही गणपतीला नैवेद्य दाखवताना पंचामृत आणि मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता.
इतर साहित्य | Ganesh Puja
याशिवाय गणपती बाप्पाची पूजा करताना फुले, हार, दिवा, कापूर, लोचन, सुपारी, हळद, पिवळे वस्त्र, दुर्वा घास, अगरबत्ती या गोष्टी देखील असणे गरजेचे आहे.