Ganesh Visarjan 2024 : मुंबईत विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल; कोणते मार्ग बंद , कोणते सुरु ?

ganesh visarjan mumbai
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ganesh Visarjan 2024 : मुंबईतील विसर्जन सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असून मिरवणूक सुरळीतपणे पार पडावी म्हणून वाहतूक व्यवस्थेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. देशभरात उद्या अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जन केले जाणार आहेत मुंबईतील गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शिवाय विसर्जन मिरवणुकी देखील मोठ्या दिमाखात पार पाडल्या जातात. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे कोणतीही गैरसोयी होऊ नये याकरिता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले (Ganesh Visarjan 2024) आहेत. चला जाणून घेऊया…

‘हे’ मार्ग पूर्णपणे बंद राहतील

मिरवणूक विसर्जन सोहळ्याच्या वेळेमध्ये वाहतुकीसाठी काही मार्ग बंद ठेवले जाणार आहेत यामध्ये लाखलाल पारेख मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, रामभाऊ साळगावकर मार्ग, जे एस एस रोड, विठ्ठल भाई पटेल मार्ग, बाबासाहेब जयकर मार्ग, राजाराम मोहन रॉय रोड, कावसजी पटेल टॅंक रोड, पंडिता रमाबाईमार्ग, दादासाहेब भडकमकर मार्ग, नेताजी सुभाष चंद्र बोस मार्ग, महापालिका मार्ग, एस व्ही पी रोड, संत सेना मार्ग, नानुभाई देसाई रोड, सरदार वल्लभभाई पटेल रोड, जिना भाई मुलजी राठोड मार्ग या मार्गावर वाहतुकीसाठी बंदी घालण्यात येणार आहे

याबरोबरच विसर्जन मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार असून दादर मधले ज्ञानेश्वर मंदिर मार्ग, जांभेकर महाराज मार्ग, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, संपूर्ण केसरकर रोड, एम बी राऊत रोड, टिळक ब्रिज, एस के बोले रोड आणि जुहू येथील देवळे रोड, जुहू तारा रोड या मार्गावर (Ganesh Visarjan 2024) वाहतुकीस पूर्णपणे बंदी राहणार आहे.

100 पेक्षा अधिक व्यक्ती पुलावर नकोत

कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धोकादायक पुलांवरून विसर्जन मिरवणुका जात असताना सुरक्षा व्यवस्थेला अधिक महत्त्व दिले गेले असून पुलांवर 100 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र न जमाव्यात याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच जुने आणि धोकादायक पोलांवर विसर्जन मिरवणुका थांबणार नाहीत याचीही दक्षता घेण्यात येणार आहे.

…अन्यथा होणार कारवाई (Ganesh Visarjan 2024)

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच विसर्जन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी संबंधित सुरक्षेच्या निर्देशांचा पालन करावे असे आवाहन देखील मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. दरम्यान वाहतूक व्यवस्थेमध्ये झालेल्या बदलांमुळे विसर्जन सोहळा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. (Ganesh Visarjan 2024) यामुळे वाहतूक आणि सुरक्षेच्या संबंधितांना आवश्यक अडचणी टाळता येतील अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.