Ganeshotsav 2024 : विधानसभेसाठी भाजपचा मेगा प्लॅन ! कोकणात जाणाऱ्यांकरिता केली बस आणि ट्रेन्सची सोय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ganeshotsav 2024 : संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. त्यातही कोकणात मोठ्या दिमाखात हा सण साजरा होतो. या सणाला कोकणवासी सुद्धा आवर्जून हजेरी लावतो. मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. यासाठी शासनाकडूनही प्रवाशांची सोय करण्यात आली आहे.

आता याबरोबरच भाजपने सुद्धा चाकरमान्यांची सोय केली आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खास बस आणि रेल्वेची सोय भाजप कडून करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर विधानसभा (Ganeshotsav 2024) निवडणुकीत विजयासाठी भाजप कंबर कसून काम करीत आहे. एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजनेनंतर आता कोकणवासी मतदारांना खुश करण्यासाठी भाजपने प्लॅन आखला आहे.

कोकणात जाण्यासाठी भाजपकडून विशेष बस आणि रेल्वे गाड्या सुद्धा सोडण्यात येणार आहेत. मुंबई महानगरातून तब्बल 700 बसेस आणि ६ ट्रेन्सचे नियोजन करण्यात आले आहे. लवकरच या बस आणि ट्रेनच्या बुकिंगला (Ganeshotsav 2024) भाजप कार्यालयात सुरुवात होणार आहे. मुंबईत कोकणी मतदारांचा आकडा मोठा असून याच मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून सर्वाधिक बसेस सोडण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटलं जात आहे.

खरंतर वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये बॅनर लागले आहेत. या बॅनर वर आशिष शेलार यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. याबरोबरच मोदी, शहा, फडणवीस, बावनकुळे, यांच्यासह उज्वल निकम यांचा देखील (Ganeshotsav 2024)फोटो दिसत आहे. या बॅनर वर दिलेल्या माहितीनुसार मुंबईतून रायगड आणि पुढे कोकणातील चाकरमान्यांसाठी खास सोय करण्यात आली आहे. यासाठी 20 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये फॉर्म भरण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. अर्ज करताना निवडणूक ओळखपत्र आणि आधार कार्डची खरी आणि झेरॉक्स प्रत सोबत आणण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. खार पश्चिम येथून या बसेस सोडणार आहेत.

तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा फोटो (Ganeshotsav 2024) असलेल्या बॅनर वर विरार ते रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग एसटी बस सेवा असा बॅनर लावण्यात आला आहे याचे बुकिंग 15 ऑगस्ट पासून सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे.