Ganeshotsav 2025 : गणेशोत्सवानिमित्त 5000 ज्यादा गाड्या सोडणार; ST महामंडळाचा मोठा निर्णय

Ganeshotsav 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganeshotsav 2025। सध्या सर्वजण गणपती बाप्पाची आतुरतेने वाट बघत आहेत. गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारीही सुरु आहे. गणेशोत्सवाला मुंबई पुण्यात असलेले चाकरमानी सुट्टी टाकून गावी जातात आणि गणेशाची पूजा अर्चा करतात. खास करून कोकणी माणसासाठी गणेशोत्सव म्हणजे दिवाळी पेक्षाही मोठा सण… त्यामुळे एकवेळ कोकणी माणूस नोकरी सोडेल, पण गणपतीला गावी जाणार म्हणजे जाणारच… त्यामुळे गणेशोत्सवासाठी प्रवासावरही ताण पडतो. या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात ५००० ज्यादा ST बस सोडणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे.

नुकतंच एसटी महामंडळाची एक बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, गणपती उत्सव (Ganeshotsav 2025) म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या -तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते. यंदा सुमार 5000 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे, उपलब्ध होणार आहे.

गट आरक्षण कधीपासून सुरु होणार ? Ganeshotsav 2025

जादा बसेस मध्ये व्यक्तिगत आरक्षणा बरोबरच गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे. गट आरक्षण २२ जुलैपासून सुरू होत आहे. २३ ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सवाला ४३०० बसेस सोडण्यात आल्या होत्या, त्या तुलनेत यंदा ७०० बसेसची वाढ करण्यात आली आहे. गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav 2025) एसटीची वाहतूक सुरळीत चालावी यासाठी बसस्थानके आणि बसथांब्यांवर एसटीचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच, कोकणातील महामार्गांवर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथके देखील तैनात करण्यात येणार आहेत.