हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील गणेशोत्सव म्हणजे एक वेगळीच मज्जा…. मुंबईत गणेश मंडळाची संख्या मोठी आहे आणि भक्तांचीही… चिंचपोकळी येथील चिंतामणी गणेश, लालबागचा राजा, परळ येथील नरे पार्कचा गणपती, गणेश गल्लीचा राजा हि मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळ आहेत. दरवर्षी लाखो भाविक या मंडळांना भेट देतात आणि गणरायाचे आशीर्वाद घेतात. मात्र दुसरीकडेही असाही एक गणपती आहे जो यावर्षी सर्वांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरू शकतो. होय आम्ही बोलतोय दक्षिण मुंबई स्थित खेतवाडीच्या ११ व्या गल्लीच्या गणपती मूर्तीबाबत…. या गणेश मंडळाने यंदा स्वानंद अवतारात गणेश मूर्ती बनवली असून तिची उंची तब्बल ४२ फूट आहे. मंडळाचे अध्यक्ष हेमंत दीक्षित यांनीच स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
‘खेतवाडीचा लंबोदरा’ ची स्थापना हि १९६२ मध्ये झाली असून यंदा खेतवाडीच्या लंबोदराचे ६४ वे वर्ष साजरे होत आहे. काल मंडळाने गणेशाच्या मूर्तीचे अनावरण केले, ज्यामुळे ती भाविक आणि पर्यटकांच्या प्रचंड गर्दीसाठी एक प्रमुख आकर्षण बनली. यंदा ४२ फूट उंचीची स्वानंद अवतारात गणेशमूर्ती बसवली जाणार आहे. या अवताराबद्दल बोलताना मंडळाचे अध्यक्ष हेमंत दीक्षित म्हणाले कि, या वर्षीचा अवतार आमच्या थीमशी जुळतो. ही मूर्ती मूळ ‘स्वानंद गणपती’ स्वरूपात असेल. मूर्तीच्या खाली एक ‘याली’ आहे.” याली हा सिंहाचे शरीर, हत्तीचे डोके आणि घोड्याचे किंवा सिंहाचे पाय असलेला एक पौराणिक प्राणी आहे. भगवान गणेशाला सिंहासन म्हणून यालीवर बसवलेले दाखवले जाऊ शकते.
‘खेतवाडीचा लंबोदराची निर्मिती हि यंदा गिरगावचे मुर्तिकार सुनील वराडकर यांनी केली आहे.गेल्या वर्षी, खेतवाडी ११ व्या गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ४७ फूट उंचीची मूर्ती बसवली होती.तर २०२३ मध्ये, इंद्रदेव अवतारात ‘मुंबईचा महाराजा’ यांची ४५ फूट उंचीची मूर्ती सादर करण्यात आली. तर यंदा ४२ फुटाची मूर्तीची प्रतिष्ठान केली जात आहे. यंदा मूर्तीची उंची कमी केली आहे.त्याचे कारण विशेष असे काही नाही असे स्पष्टीकरण मंडळाचे अध्यक्ष दीक्षित यांनी सांगितले.




