Ganeshotsav Celebration | आपल्या भारताला एक पारंपरिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे आपण सगळे सण उत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो. अशातच येत्या चार-पाच दिवसात भारतातील सगळ्यात मोठा सण गणेश उत्सव आहे. गणेश उत्सव प्रत्येक घराघरात आणि शहरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपण गणपतीला आपले आराध्य दैवत मानतो. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही गणपतीच्या पूजनाने केली जाते. हिंदू धर्मात कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करायची असेल, किंवा कोणतेही शुभकाम करायचे असेल, तर सगळ्यात आधी गणपतीचे पूजन केले जाते. दरवर्षी भारतामध्ये गणेश जन्मानिमित्त गणेश चतुर्थी (Ganeshotsav Celebration) मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी लोक बाप्पाची मूर्ती घरी आणतात आणि त्याची मनोभावे पूजा करतात.
अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आनंदाने गणपतीची पूजा करत असतात. यावर्षी येत्या 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी लोक त्यांच्या घरी बाप्पाची स्थापना करतात. काही लोकांच्या घरी बाप्पा हा दीड दिवसांचा असतो, काही लोकांच्या घरात तोच पाच दिवसांचा असत, तर काही लोकांच्या घरात अकरा दिवसात असतो. प्रत्येकजण त्याच्या सोयीप्रमाणे गणपती बाप्पाची जमेल तेवढी आराधना आणि पूजा करतात.
गणपतीचा जन्म हा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला मानला जातो. 2004 मध्ये ही तिथी 6 सप्टेंबर रोजी येत आहे. चतुर्थीची तारीख ही 6 सप्टेंबर 2024 पासून दुपारी 3 : 1 मिनिटापासून चालू होत आहे. तर दुसऱ्या दिवशी 7 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजून 37 मिनिटापर्यंत असणार आहे. पुराणानुसार श्री गणेशाचा जन्म हा दुपारच्या वेळेस झालेला आहे. त्यामुळे गणपतीची पूजा करण्याची शुभ वेळ ही दुपारची वेळ मानली जाते. यावर्षी तीन शुभयोग तयार होणार आहेत. आता ते कोणते योग आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
तीन शुभयोग कोणते ? | Ganeshotsav Celebration
यावर्षी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर काही शुभ योग तयार होत आहे. यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढलेले आहे. या दिवशी ग्रहांची स्थिती ही परिपूर्ण असते. त्यामुळे या काळामध्ये उपासनेचे परिणाम खूप जास्त लाभदायी असतात. हा योग 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजून 34 मिनिटांनी सुरू होईल, तर 8 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजून 30 मिनिटापर्यंत असेल. यावर्षी चतुर्थीला रवी योग देखील तयार होत आहे. हा रवी योग 6 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी सुरू होईल, तर 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजून 34 मिनिटापर्यंत चालेल. या दिवशी ब्रह्मयोग देखील तयार होत आहे. त्यामुळे या योगाची निर्मिती खूप शुभदायक मानली जाते.
बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची योग्य वेळ
तुम्ही तुमच्या घरात बाप्पाची मूर्ती आणल्यावर त्या मूर्तीची वेळेमध्ये प्राणप्रतिष्ठा होणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही 7 सप्टेंबर रोजी दुपारपासून बाप्पाची मूर्ती घरी आणू शकता. त्याचा शुभ योग सकाळी 12 वाजून 3 मिनिटांपासून सुरू होईल, ते दुपारी 1 वाजून 34 मिनिटापर्यंत राहील. म्हणजे गणपतीच्या स्थापनेसाठी केवळ 150 मिनिटांचा शुभमुहूर्त आहे. यामध्ये जर तुम्ही गणपती बाप्पाची तुमच्या घरात स्थापना केली, तर यातून तुम्हाला खूप शुभ लाभ होईल