बोरगाव पोलिसांची कामगिरी : दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने चोरी करणारी टोळी जेरबंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | दागिने पॉलिश करून देतो असे सांगून फसवणूक करून चोरी करणारी परप्रांतीय टोळीला बोरगाव पोलिसांनी शिताफीने जेरबंद करण्यात यश मिळविले. या टोळीतील दोघांनी अतीत (ता.सातारा) येथे अश्याच प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून या टोळीने उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अश्याच प्रकारचा गुन्हा केला आहे. टोळीतील सचिनकुमार योगेंदर साह व रंजित गेंदालाल साह यांना पोलीस कोठडी मिळाली असून त्यांच्याजवळून अतीत येथून चोरलेला मुद्देमाल व दुचाकी जप्त केली आहे.उर्वरित इतर संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार २८ सप्टेंबर रोजी रात्रगस्त घालत असताना बोरगाव पोलिसांना अतीत येथील एसटी बसस्थानकाजवळ ८ इसम संशयितरीत्या फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यानी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांची तपासणी केली. यावेळी त्यांच्याकडे असणाऱ्या बैगेत दागिने पॉलिश करण्यासाठी वापण्यात येणारी पावडर, ब्रश असे साहित्य आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ नुसार कारवाई केली.

दरम्यान, बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अतीत सह उंब्रज व कोयनानगर येथे दागिने पॉलिश करून देण्याचा बहाण्याने फसवून दागिने चोरून नेण्याच्या फिर्यादी दाखल झाल्या असल्याने बोरगाव पोलिसांनी या टोळक्याची अधिक चौकशी केली. यावेळी टोळीतील सचिकुमार साह व रंजित साह यांनी अतीत येथे गुन्हा केल्याचे कबूल केले.
तसेच उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अश्याच प्रकारे फसवणूक केल्याचेही सांगितले. पोलिसांनी अतीत येथील गुन्ह्यातील सुमारे २० हजार रुपये किमतीची दोन सोन्याची कर्णफुले व संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.सचिनकुमार साह व रंजित साह हे सध्या बोरगाव पोलीसांच्या कोठडीत असून उर्वरित संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत.

सदरील कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि डॉ.सागर वाघ, हवालदार प्रवीण शिंदे,धनंजय जाधव, राजू शिखरे, विशाल जाधव व विजय साळुंखे यांनी केली.

Leave a Comment