Monday, February 6, 2023

अश्लील VIDEO व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर सामूहिक बलात्कार

- Advertisement -

पुणे : हॅलो महाराष्ट्र – मावळ तालुक्यातील देहूरोड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पीडितेने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार या आरोपींविरोधात कलम 342, 376 (1), 376 (ड), 377, 323, 504, 506, 120 (ब), आय.टी ॲक्ट 67, अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम 3 (1) (12) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी अरबाज जाविद खान, मुस्ताक सलीम सय्यद, सोहेल शेरअली पिरजादे ,रियाज जाविद खान तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. मागच्या पाच महिन्यांपूर्वी पीडित मुलीचे अश्लील व्हिडीओ बनवण्यात आले होते. यानंतर आरोपी वारंवार तिला जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होते.

- Advertisement -

नराधमांच्या या प्रकाराला तरुणी वैतागली होती. या त्रासाला कंटाळून पीडितेने हि बाब आपल्या नातेवाईकांना सांगितली. यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून देहूरोड पोलिसांनी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने आपल्या तक्रारीत जनावरांच्या गोठ्यात तसेच देहूरोड शहरातील स्मशानभूमीजवळ असलेल्या निर्जनस्थळी बलात्कार केल्याचे सांगितले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन देहूरोड पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. पीडित तरुणीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक-पाटील करत आहेत. या प्रकरणी नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केली जात आहे.