धक्कादायक ! चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

ढाका : वृत्तसंस्था – ढाका या ठिकाणी सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. यामध्ये एका 22 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हि घटना मागच्या शुक्रवारी आशुलिया मवेशी बाजारामध्ये घडली आहे. या घटनेनंतर त्या तरुणीने आशुलिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अटक करण्यात आलेल्यापैकी मुख्य आरोपी हा बसचालक आहे. आर्यन, शाजू, सुमोन मियां, मुनव्वर, शोहाग आणि सैफुल इस्लाम अशी बाकी आरोपींची नावे आहेत. हे सगळेजण तुरागच्या कामरपाडा येथील रहिवासी आहेत. पीडित तरुणी हि माणिकगंजमधील आपल्या बहिणीच्या घरुन नारायणगंज येथील आपल्या घरी जात होती. तेव्हा शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नबीनगर बस स्टॅण्डवर पोहोचली. तेव्हा तिची नजमुलसोबत ओळख झाली.

नबीनगर बस स्टॅण्डवर लोक दुसऱ्या बसची वाट पाहात असतानाच तिथे एक बस पोहोचली. तेव्हा या बसमध्ये सुमोन, मुनव्वर आणि सैफुल होते. त्यांनी सांगितले कि टोंगी स्टेशन रोडपर्यंत 35 टक्के भाडे घेणार. यानंतर पीडित तरुणी आणि नजमुल बसमध्ये चढले. मात्र, आरोपींनी इतर प्रवाशांना अर्ध्या रस्त्यातच बसमधून खाली उतरवले. यानंतर आरोपींनी पीडित तरुणी आणि नजमुलला बांधून ठेवत बस पुन्हा नबीनगरकडे वळवली. यावेळी सहा आरोपींनी बसमध्येच तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर शेजारुनच जात असलेल्या पोलिसांनी मदतीसाठी आवाज देत असलेल्या नजमुलचा आवाज ऐकला आणि त्यांनी बस थांबवून सहा आऱोपींना अटक केली.