बनावट सोने विकणार्‍या टोळीचा सातारा पोलिसांवर हल्ला; जिल्हा पोलिस प्रमुखांनी कोम्बिंग ऑपरेशन करुन काही तासात केली अटक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

बनावट सोने विकणार्‍या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. सदर टोळी एका शेतात असल्याची खबर्‍यांकडून माहिती मिळाल्यानंतर गोपनिय माहितीची खातरजमा करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना टोळीच्या सदस्यांनी जबर मारहान केली होती. त्यानंतर कोम्बिंग ओपरेशन करुन अखेर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सदर मध्यप्रदेशातील टोळीला सातारा पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पेरले येथील एका उसाच्या शेतात बनावट सोने विकणारी टोळी असल्याची माहीती पाटणचे पोलिस कर्मचारी मुकेश संभाजी मोरे यांना मिळाली. मुकेश मोरे हे सातारा येथे जात असताना मिळालेल्या गोपनीय माहीतीची खात्री करण्यासाठी गेले असता, तेथे असणाऱ्या काही युवकांनी त्यांना मारहाण केली. शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पोलिस कर्मचाऱ्यांवर डोक्यात हल्ला केला. त्यामुळे पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. मुकेश मोरे सदरची खबर उंब्रज पोलिस स्टेशनला दिली असता. सातारा एलसीबी, पाटण, कराड व उंब्रज पोलिस यांनी ॲक्शन घेतली. ऊसाच्या शेतात कोम्बिंग ऑपरेशन केले, आणि टोळीला ताब्यात घेतले. शनिवारी सकाळी सात वाजता मध्यप्रदेश येथील पटना येथील टोळीला ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, टोळीवर पोलिसांवर हल्ला करणे, शासकीय कामात अडथळा आणणे ३३२, ३५३, ३९३ कलमनुसार गुन्हा दाखल झाला आहे. तर युवकाच्या तक्रारीवरून ३९५, ३९३ गुन्हा दाखल होणार आहे. अप्पर पोलिस अधिकारी धीरज पाटील, एलसीबीचे प्रमुख किशोर धुमाळ, पोलिस उपअधिक्षक अशोक थोरात, डॉ रणजित पाटील, उंब्रजचे एपीआय अजय गोरड यांच्यासह कर्मचाऱ्यांना कोम्बिंग ऑपरेशन करून बनावट सोने विकणाऱ्या टोळीला ताब्यात घेतल्याचे पोलिस प्रमुख अजय बन्सल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

You might also like