Ganga Expressway : 594 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग लवकरच होणार सुरु; कसा असेल रूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जागतिक पातळीवर देशाला एक उत्तम स्थान देण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. त्यासाठी विविध प्रकल्प, दळणवळणाच्या सोयी – सुविधा निर्माण करण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात. गेल्या काही वर्षात देशातील रस्ते चकचकीत करण्याकडे सरकारचा प्रयत्न आपण बघतोय. त्यातच आता भारताच्या वैभवात आणखी भर घालण्यासाठी लवकरच 594 किलोमीटरचा महामार्ग २०२५ पर्यंत सुरु होणार आहे. उत्तर प्रदेशातील ‘गंगा एक्स्प्रेसवे’ (Ganga Expressway)असे या महामार्गाचे नाव असून ह्याचा रूट कसा असेल ते जाणून घेऊयात.

मेरठ ते प्रयागराज असा असेल रूट- Ganga Expressway

गंगा एक्सप्रेसवे हा उत्तर प्रदेशात येणाऱ्या प्रवाश्यांना तसेच वाहतुकीला सोयीस्कर जावा यासाठी बांधण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांना रोजगार देखील मिळणार आहे. हा मार्ग एकूण 594 किलोमीटरचा आहे. हा मार्ग एकूण 12 पॅकेज मध्ये आणि चार टप्प्यात विभाजीत केला आहे आणि त्यानुसार त्याचे काम सुरु आहे. तर एक्सप्रेस वे अंतर्गत 18 फ्लायओव्हर आणि 8 रोड ओवर ब्रिज बांधण्यात येणार आहेत. या गंगा एक्सप्रेसवेमुळे प्रवास अतिशय सुखकर होईल अशी अशा व्यक्त केली जात आहे.

2025 पर्यंत पूर्ण केला जाईल महामार्ग

गंगा एक्सप्रेसवेची (Ganga Expressway) वाट अनेकजण मोठ्या आशेने पाहत आहेत. कारण यामुळे पर्यटनासाठी फायदा होणार आहे. हा महामार्ग 2025 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती समोर आली असून सध्या या मार्गाचे काम 22 टक्के पूर्ण झाले आहे. तर राहिलेले काम हे लवकरच पूर्ण होणार आहे. 2025 हा मार्ग नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. डिसेंबर 2024 ला या मार्गाचे काम पूर्ण होईल. असे सांगण्यात येत आहे.

कुंभमेळ्याच्या पूर्वीच सर्वसामान्यांसाठी खुला केला जाईल मार्ग

उत्तर प्रदेश आणि तेथील कुंभमेळा यासाठी सर्वचजण उत्सुक असतात. 2025 ला कुंभमेळा सुरु होणार आहे. त्यासाठी प्रवाश्यांना सोयीस्करपणे येता यावे या उद्देशाने कुंभमेळ्याच्या पूर्वीच ‘गंगा एक्सप्रेसवे’ मोकळा केला जाणार आहे.