Wednesday, October 5, 2022

Buy now

कराडमध्ये गंगा मेडिसन शॉपीचे आज उद्घाटन

कराड | येथील कराड एस टी स्टँण्ड परिसरात गंगा मेडिसन शॉपीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांच्या हस्ते व सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार व माजी राज्यपाल सिक्कीम श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ होणार असल्याची माहिती गंगा मेडिसन शॉपीच्या प्रमुख मीना चव्हाण यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी शेखरसिंह, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल, जिल्हा परिषद सदस्य व रयत कारखाना चेअरमन अँड. उदयसिंह पाटील, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौंडा, के. एन. गुजर चँरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष डॉ. अशोक गुजर, सातारा जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील, स्वातंत्र्य सैनिक रघुनाथ चव्हाण ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद चव्हाण व उत्तर तांबवे माजी सरपंच शशिकांत चव्हाण, अथर्व चव्हाण व रोहन चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे.

तांबवे येथील रहिवाशी असलेले अरविंद चव्हाण यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले आहे. कराड येथील गंगा मेडिसन मध्ये सर्व प्रकारची अँलोपॅथिक, होमोपॅथिक, बेबी केअर प्रॉडक्ट, बी पी व शुगर मोफत तपासणी करून दिली जाते. घरपोच औषधांची सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येते. सौंदर्यप्रसाधने व आयुर्वेदिक औषधेही येथे उपलब्ध करण्यात आलेली असल्याची माहिती मीना चव्हाण यांनी दिली.