गणपती बाप्पा मोरया : सातारा जिल्ह्यातून 150 बसेस जादा सुटणार, गणेश भक्तांचा प्रवास सुखकारक होणार

0
78
Ganesh St bus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एस. टी) जादा बस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील 11 डेपोतून लांब पल्यांच्या व जिल्ह्यांतर्गत अशा एकूण 150 हून अधिक जादा बस सुटणार आहे. त्यामुळे गणेश भक्तांचा प्रवास सुखकारक होणार आहे.

गणेशोत्सव तोंडावर आल्याने मध्यवर्ती बस स्थानकासह इतर ठिकाणी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे एस. टी प्रशासनाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गणेशोत्सवाचा मुख्य कालावधी व परतीचा प्रवास अशा पद्धतीने वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई, पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन जास्तीत-जास्त बस पाठविण्यात येणार आहेत. याचबरोबर, गणेशोत्सवाच्या काळात मार्ग तपासणी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोनाच्या काळात एस.टी महामंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, गेल्या पाच महिन्यापासून कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आल्याने वाहतूक सुरु झाली. परंतु, सद्यस्थितीतही कोरोनाच्या भितीने प्रवाशांची कमी संख्या असल्याने आर्थिक उत्पन्नाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर गणेशोत्सव सणानिमित्त महामंडळ सर्वात जास्त आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीने जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here