भक्तांच्या सोयीसाठी रेल्वे सुरु करणार Ganpati Special Trains, लिस्ट तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ganpati Special Trains : गणेशोत्सवाच्या काळात भक्तांच्या सोयीसाठी रेल्वेकडून या वर्षी देखील अनेक स्‍पेशल गाड्या सुरु केल्या जात आहेत. पश्चिम रेल्वेने आता गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील उधना स्थानक ते गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकादरम्यान 2 स्‍पेशल गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार आहेत. 27 आणि 29 ऑगस्ट रोजी उधना ते मडगाव स्‍पेशल गाडी धावणार आहे. त्याचवेळी 28 आणि 30 ऑगस्ट रोजी मडगाव ते उधना दरम्यान ही गाडी धावणार आहे.

Railway operate Ganpati special trains in Konkan route reservation started | Ganpati Special Train: कोंकण जाने वाली गणपति विशेष ट्रेनों में रिजर्वेशन हुआ शुरू, यहां जानिए डिटेल्स ...

25 ऑगस्टपासून PRS काउंटर आणि IRCTC अधिकृत वेबसाइटवरून प्रवाश्यांना या Ganpati Special Trains चे तिकीट बुक करता येतील. या दोन्ही स्पेशल गाड्या नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावरदा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या ठिकाणी थांबतील.

गेल्या वर्षी देखील रेल्वेकडून 100 Ganpati Special Trains सुरु केल्या होत्या. गणेश चतुर्थीला होणारी प्रचंड गर्दी पाहता यंदाच्या वर्षी देखील अनेक गणपती स्पेशल ट्रेन सुरु करण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. या स्‍पेशल गाड्यामुळे भक्तांसह सर्वसामान्य प्रवाशांना देखील प्रवासासाठी मोठा फायदा होईल.

Indian Railways have started additional special trains for Ganesh Chaturthi festival 2020 - RailYatri Blog

मुंबई सेंट्रल ते मडगाव

ट्रेन क्रमांक 09004 मडगाव – मुंबई सेंट्रल स्पेशल: मडगावहून दर मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी 09.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मुंबई सेंट्रलला 01.00 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 25 ऑगस्ट 2022 ते 12 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरु असेल. Ganpati Special Trains

ट्रेन क्रमांक 09003 मुंबई सेंट्रल – मडगाव स्पेशल: मुंबई सेंट्रल येथून दर सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री 12.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.30 वाजता मडगावला पोहोचेल. ही ट्रेन 24 ऑगस्ट 2022 ते 11 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरु असेल.

मुंबई सेंट्रल ते ठोकूर

ट्रेन क्रमांक 09001 मुंबई सेंट्रल – ठोकूर स्पेशल: दर मंगळवारी मुंबई सेंट्रल येथून 12.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 09.30 वाजता ठाकूरला पोहोचेल. ही ट्रेन 23 ऑगस्ट 2022 ते 6 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरु असेल. Ganpati Special Trains

ट्रेन क्रमांक 09002 ठोकूर- मुंबई सेंट्रल स्पेशल प्रत्येक बुधवारी ठाकूर येथून 10.45 वाजता सुटेल आणि मुंबई सेंट्रलला 07.05 वाजता पोहोचेल. दुसऱ्या दिवशी ही ट्रेन 24 ऑगस्ट 2022 ते 7 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरु असेल.

GOOD NEWS! Indian Railways to run 72 special trains for Ganesh Chaturthi, advance bookings start TODAY - check how to book through IRCTC website | Zee Business

वांद्रे ते कुंडल

ट्रेन क्रमांक 09011 वांद्रे टर्मिनस – कुंडल स्पेशल: वांद्रे टर्मिनस येथून दर गुरुवारी 14.40 वाजता सुटेल आणि कुंडल येथून दुसऱ्या दिवशी 05.40 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 25 ऑगस्ट 2022 ते 08 सप्टेंबर 2022 पर्यंत धावेल.

ट्रेन क्रमांक 09012 कुंडल – वांद्रे टर्मिनस स्पेशल: कुडाळहून दर शुक्रवारी 06.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 21.30 वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल. ही ट्रेन 26 ऑगस्ट 2022 ते 09 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरु असेल. Ganpati Special Trains

अहमदाबाद ते कुंडल

ट्रेन क्रमांक 09411 कुंडल-अहमदाबाद स्पेशल: कुंडल दर बुधवारी 06.45 वाजता सुटेल आणि अहमदाबादला दुसऱ्या दिवशी 3.30 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 31 ऑगस्ट 2022 आणि 07 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरु असेल.

ट्रेन क्रमांक 09412 अहमदाबाद-कुंडल स्पेशल: अहमदाबादहून दर मंगळवारी 09.30 वाजता सुटेल आणि कुंडल येथे 05.40 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 30 ऑगस्ट 2022 आणि 06 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरु असेल. Ganpati Special Trains

Ganesh Chaturthi 2022: Indian Railways to run 214 special trains, Check full list here | Railways News | Zee News

विश्वामित्री ते कुंडल

ट्रेन क्रमांक 09150 विश्वामित्री – कुंडल स्पेशल: विश्वामित्रीला दर सोमवारी सकाळी 10.00 वाजता सुटेल आणि कुंडलला दुसऱ्या दिवशी 05.40 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 29 ऑगस्ट 2022 आणि 05 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरु असेल.

ट्रेन क्रमांक 09149 कुंडल – विश्वामित्री स्पेशल: कुंडल येथून दर मंगळवारी 06.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 01.00 वाजता विश्वामित्रीला पोहोचेल. ही ट्रेन 30 ऑगस्ट 2022 आणि 06 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरु असेल. Ganpati Special Trains

उधना ते मडगाव

ट्रेन क्रमांक 09018 उधना – मडगाव स्पेशल : दर शुक्रवारी उधना येथून 15.25 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 09.00 वाजता मडगावला पोहोचेल. ही ट्रेन 26 ऑगस्ट 2022 ते 09 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरु असेल.

ट्रेन क्रमांक 09017 मडगाव – उधना स्पेशल मडगावहून दर शनिवारी सकाळी 10.05 वाजता सुटेल आणि उधना येथे दुसऱ्या दिवशी 05.00 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 27 ऑगस्ट 2022 ते 10 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरु असेल. Ganpati Special Trains

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://cr.indianrailways.gov.in/view_detail.jsp?lang=0&dcd=7737&id=0,4,268

हे पण वाचा :

Multibagger Stock : गेल्या 6 महिन्यांत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा नफा !!!

EPFO मध्ये ई-नॉमिनेशन दाखल करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

Samsung Galaxy A04 : 50 MP कॅमेरा, 5,000mAh च्या बॅटरीसह Sumsung ने लॉन्च केला दमदार मोबाईल

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल, आजचे नवे दर तपासा

फिजिकल गोल्डप्रमाणे Sovereign Gold Bonds वर देखील कर्ज मिळेल का ???