कैलासनगर स्मशानभूमीतील गॅसदाहिनीचे काम पूर्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. कोरोनामूळे बर्‍याच जणांना जीव गमवावा लागला. त्यातच स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कारासाठी प्रचंड गर्दी होत होती. यामुळे महापालिकेने शहरातील प्रमुख पाच स्मशानभूमी मध्ये गॅसदाहिनी उभारण्याचा निर्णय घेतला होता. आता कैलास नगर येथील स्मशानभूमीत गॅसदाहिनी उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या गॅसदाहिनीची चाचणी महापालिकेमार्फत लवकरच होणार आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यावर या गॅसदाहिनीचा वापर केला जाईल.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. बाहेर गावी असलेले, उपचारासाठी औरंगाबाद येथे आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार शहरातील स्मशानभूमीत करावे लागत असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी रांगेत उभे राहावे लागत होते. यामुळे महापालिकेचे प्रशासन आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी कैलासनगर स्मशानभूमीत गॅसदाहिनी उभारण्यासाठी उद्योजक संस्थांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते.

यानंतर सामंजस्य करार करून अवघ्या दोन महिन्यांमध्ये गॅसदाहिनी उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता या गॅसदाहिनीची चाचणी महापालिकेकडून घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचा वापर सुरू करणार आहे.

Leave a Comment