हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) दरात कपात करण्यात आली आहे. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या राज्यामध्ये निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार नागरिकांसाठी मोठमोठे निर्णय घेताना दिसत आहे. अशातच व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 30 रुपयांहून अधिक कपात करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर 30.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
मधल्या काळामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे एलपीजी गॅस सिलेंडरचे दर कधी कमी करण्यात येईल? असा प्रश्न सतत नागरिकांकडून विचारला जात होता. अखेर आजपासून सरकारने एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी केले आहेत. या गॅस सिलेंडरचे दर आता 30.50 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. हे दर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमी करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
कोणत्या राज्यात किती रुपयांनी स्वस्त?
- मुंबईमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 31.50 रुपयांनी स्वस्त
- दिल्लीत एलपीजी सिलेंडरचे दर 30.50 रुपयांनी स्वस्त
- कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरचे दर 32 रुपयांनी स्वस्त
- चेन्नईमध्ये एलपीजी सिलेंडरचे दर 30.50 रुपयांनी स्वस्त
दरम्यान सध्या सरकारकडून फक्त व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे. परंतु यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दर पूर्वीसारखेच आहे. त्यामुळे हा गॅस सिलेंडर नागरिकांना पूर्वीच्या दरामध्ये उपलब्ध होणार आहे. सध्याच्या घडीला दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 803 रुपये इतकी आहे. तर मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 802.50 रुपये इतकी आहे. आता या गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकार कधी कपात करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.