Wednesday, February 8, 2023

औरंगाबादेत लवकरच होणार पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा; भारत गॅसने मागितली महापालिकेला परवानगी

- Advertisement -

औरंगाबाद | पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा करण्याची तयारी भारत गॅस रिसोर्सेस कंपनीने सुरू केली आहे. महापालिकेच्या प्रभाग 7 व 9 मध्ये पहिल्या टप्प्यात काम सुरू होणार असून या भागात पाईप टाकण्यासाठी कंपनीने मनपाकडे परवानगी मागितली आहे.

ही पाइपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करावे लागणार आहे. त्यामुळे रस्त्याचे नुकसान होणार असल्याने 18 कोटी 85 लाख रुपये महापालिकेला भरावेत, असे पत्र प्रशासनाने कंपनीला दिल्याची माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली आहे. औरंगाबाद शहरासोबतच वाळूज एमआयडीसी भागात पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा व्हावा, यासाठी नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी प्रयत्न केले होते. औरंगाबाद ते नगर या भागात आता पाइपलाइन टाकण्याचे काम वेगात सुरू आहे. त्याचबरोबर वाळूजपर्यंत पाइप टाकण्यात आले आहेत.

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात शहरातील दोन प्रभागांत घरोघरी एलपीजी गॅस पाइपलाइनद्वारे देण्याची तयारी कंपनीने केली. त्यानुसार, भारत गॅस रिसोर्सेस कंपनीने महापालिकेला पत्र देत, प्रभाग सात आणि नऊमध्ये रस्त्याशेजारी पाइपलाइन टाकण्याची परवानगी मागितली आहे. पाईप टाकण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम करावे लागणार आहे. त्यापोटी खर्च म्हणून महापालिकेला 18 कोटी 85 लाख रुपये भरावेत, असे मनपातर्फे कळविण्यात आले.