गौतम गंभीरने निवडली ऑल टाइम बेस्ट XI; पाकिस्तानचे 3 खेळाडू, भारताचा एकही नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) त्याची ऑल टाइम बेस्ट XI जाहीर केली आहे. मात्र गंभीरच्या संघात ३ पाकिस्तानी खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या दिग्गज क्रिकेटपटूंचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. मात्र भारताच्या एकाही खेळाडूला गंभीरच्या ऑल टाइम बेस्ट XI मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. भारतात सचिन तेंडुलकर, राहूल द्रविड, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी असे अनेक दिग्गज खेळाडू असताना गंभीरने या खेळाडूंना संघात का स्थान दिल नाही असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

स्पोर्ट्सकीडाशी संवाद साधताना गंभीरला त्याच्या ऑल टाइम संघाबाबत (Gautam Gambhir All Time World XI) नाव जाहीर केली. सलामीवीर म्हणून त्याने ऑस्ट्रेलियाचा महान यष्टिरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन या डावखुऱ्या जोडीची निवड केली. मधल्या फळीत वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा, पाकिस्तानचा दिग्गज इंझमाम उल हक आणि दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलिअर्सची निवड केली आहे. अष्टपैलू म्हणून ऑस्ट्रेलियाचा अँड्रू सायमंड, इंग्लंडचा अँड्रू फ्लिंटॉफ आणि पाकिस्तानचा अब्दुल रझ्झाकला गंभीरने आपली पसंती दिली आहे. गोलंदाजी विभागाबाबत सांगायचं झाल्यास, गंभीरने श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनला एकमेव फिरकीपटूच्या रूपात निवडलं आहे. तर गंभीरच्या संघात शोएब अख्तर आणि मोर्ने मॉर्केल या दोन फास्ट बॉलर्सना स्थान मिळालं आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, झहीर खान, अनिल कुंबळे, विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा असे अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले.. मात्र तरीही यातील एकही खेळाडूला संघात स्थान द्याव असं गौतम गंभीरला का वाटलं नाही असं प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.

गौतम गंभीरची ऑल टाइम वर्ल्ड-11

ॲडम गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन, एबी डिव्हिलियर्स, ब्रायन लारा, अँड्र्यू सायमंड्स, इंझमाम-उल-हक, अब्दुल रझाक, मुथय्या मुरलीधरन, शोएब अख्तर, मोर्ने मॉर्केल, अँड्र्यू फ्लिंटॉफ.