Gautami Patil : ‘गौतमी पाटीलमुळे लावणी भ्रष्ट…’; लोककलावंत गणेश चंदनशिवे स्पष्टच बोलले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gautami Patil) कमी काळात अख्ख्या महाराष्ट्रात गौतमी पाटील या नावाची चर्चा गाजली. लावणीचे कार्यक्रम जाणीव मोठमोठे डान्स शो करून गौतमी पाटील नावाच्या तरुणीने महाराष्ट्रभर ख्याती मिळवली आहे. गौतमी पाटील एक नृत्यांगना आहे मात्र लावण्यवती नाही, असे अनेक लोककलावंतांनी म्हटले. गौतमी जे करते त्याला लावणी म्हणत नाहीत असे वारंवार बोलले गेले. गौतमीच्या नृत्यावर कित्येकांनी आक्षेप घेतला, मात्र, ‘सबसे कातिल……’ असे लौकिक मिळवत गौतमी पाटील हे नाव राज्यभरात गाजताना दिसतंय.

कित्येक लावणी सम्राज्ञी आज घरात बसून आहेत. मात्र, गौतमी पाटील (Gautami Patil) विविध कार्यक्रमांच्या रोज सुपाऱ्या घेताना दिसतेय. अशातच आता लोककलावंत प्रसिद्ध गायक गणेश चंदनशिवे यांनी एका मुलाखतीत गौतमी पाटीलच्या नृत्य शैलीवर स्पष्ट भाष्य केले आहे. ‘लावणी’ हा रुढ प्रकार गौतमी पाटीलने भ्रष्ट केला, असे त्यांनी आपले मत प्रकट करताना या प्रकाराबाबत खंत व्यक्त केली आहे. पाहुयात ते काय म्हणालेत?

लावणी भ्रष्ट झाली (Gautami Patil)

गौतमी पाटील आणि तिच्या नृत्यशैलीबाबत बोलताना गणेश चंदनशिवे म्हणाले की, ‘मध्यंतरी गौतमी पाटीलसारखी मुलगी आली. मुळात गौतमी लावणी करत नसून ती करते त्याला आयटम साँग म्हणता येईल. पण, पाहणाऱ्या प्रेक्षकांनी, लोकांनी ते लावणीवर खपवलं आहे. त्यामुळे लावणी भ्रष्ट झाली. ज्या लावणीने एवढा मोठा इतिहास दिला, त्या लावणीला कुठेतरी एक डाग लागल्यासारखं झालं आहे. पुढे तिच्यावर टीका होऊ लागली, तेव्हा तिने आपण लावणी करत नाही हे स्वत: मान्य केलं’.

लावणीला मोठी परंपरा

पुढे त्यांनी म्हटले, ‘लावणीला मोठी परंपरा लाभलेली आहे. शकुबाई, कोल्हापूरकर बाई, लक्ष्मी बाई, यमूना बाईंकडून या परंपरेला सुरुवात झाली आहे. डोईवरचा पदर ढळू न देता सुलोचना बाईंनी रजत पटावर लावणी गायली. पण आता? तुम्ही आयटम साँग करता, स्टेजवर पाण्याचे फवारे टाकता, त्यात तुम्ही कसे दिसता? (Gautami Patil) साध याकडे लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे प्रेक्षकांना लावणीची अशीच परंपरा असेल असे वाटते. त्यातून आमच्यासारखे लोक मार्ग काढत ही परंपरा टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत’.

तमाशाप्रधान चित्रपटात तमाशा नव्हताच | Dr. Ganesh Chandanshive | Catch Up | Amol Parchure

‘मला आपल्या मुंबईतील कॉन्ट्रॅक्टरांना सांगायचंय की, लावणी करा. परदेशातील मुलींना घेऊन जरी लावणी केलात तरी चालेल. पण, त्यात पारंपारिक फडावरील मुली असतील तर ते भरुन निघेल. कारण, मुळात लावणी कधी अर्धनग्न नव्हतीच. ती नखापासून केसापर्यंत शृंगाराने सजलेली आहे. तिची चोळी स्लिव्हलेस नसते. (Gautami Patil) त्यामुळे पाठ दिसत नाही. तिच्या कंबरेला पट्टा असतो आणि कासोट्याचं तिचं पातळ असतं. पायात पाच-पाच किलोचे घुंगरू असतात आणि अशी असते आपली लावणी. जिची संस्कृती जपायला हवी’.

‘तमाशा’चा जन्मच निखळ मनोरंजनासाठी

गणेश चंदनशिवे यांनी तमाशा म्हणजे काय याबाबत सांगताना म्हटले की, ‘तमाशा हा शब्द आपला नाही, हा अरबी शब्द आहे. अरबी भाषेतून तू फारसी भाषेत, तिथून उर्दूत आणि मग मराठीत येऊन हा शब्ध रुढ झाला. पूर्वी तमासा असं म्हटलं जायचं. जेव्हा मोगल उत्तरेतून दक्षिणेत आले तेव्हा ते पेशे वगैरे पाहात असत. अशाप्रकारे मोगलांनी तमाशा हा शब्द रोजच्या व्यवहारात आणला. तमाशाचा खरा अर्थ म्हणजे, ‘तमो गुणाचा जो नाश करतो तो’. तमाशाचा जन्मच निखळ मनोरंजनासाठी झाला आहे. मात्र, जे तमाशाला नावं ठेवतात त्यांनी अण्णाभाऊ साठेंचे तमाशे पाहिले पाहिजेत, काळू बाळूचा तमाशा पाहायला हवेत’. (Gautami Patil)