धक्कादायक! करोनाच्या चिंतेने जर्मनीत एका मंत्र्याची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात करोना व्हायरसमुळे हजारो लोकांचे बळी घेतले आहे. यानंतरही मृत्यूचा हा सिलसिला सुरूच आहे. करोना साथीच्या आजारामुळे सर्व देश चिंतेत आहेत. दरम्यान, करोनाच्या चिंतेतून जर्मनीच्या एका प्रांत अर्थमंत्र्यांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली आहे. जर्मनीच्या हेसे प्रांताचे अर्थमंत्री थॉमस शॉफर यांनी करोना व्हायरसच्या संसर्गामुळे होणार्‍या आर्थिक नुकसानाच्या विवंचनेतून आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.

५४ वर्षीय शॉफर यांचा मृतदेह रेल्वे रुळावर मृतावस्थेत आढळला. जर्मनीतील वेसबाडेन अभियोजन कार्यालयाच्या मंत्र्यांनी शॉफर यांनी आत्महत्या केल्याची शंका व्यक्त केली आहे. एका निवेदनात हेसेचे मुख्यमंत्री वॉल्कर बॉफियर म्हणाले की, ”शॉफर यांच्या मृत्यनं आम्हाला धक्का बसला आहे. त्यांचा मृत्यू झाला आहे यावर आमचा विश्वासच बसत नाही आहे, आम्ही खूप दु: खी आहोत.” दरम्यान, करोनामुळं मानसिक स्वास्थ सुद्धा बिघडून आत्महत्या केल्याच्या घटना आता समोर येत आहेत.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 79726 30753 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment