EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO कडून आपल्या पगाराचा काही भाग दर महिन्याला ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केला जातो. हे लक्षात घ्या कि, खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या पीएफचे व्यवस्थापन EPFO कडून केले जाते. EPFO खात्यामध्ये जमा केलेले पैसे हे भविष्यासाठी मोठा आधार ठरतात. जेव्हा आपण रिटायर होतो तेव्हा पीएफ खात्यात जमा असलेले सर्व पैसे परत मिळतात.

EPFO To Soon Disburse Pension To Over 73 Lakh Pensioners In One Go Via Central System

EPFO मध्ये जमा असलेल्या पैशांवर कोणतीही जोखीम नसते. तसेच त्यावरील व्याज दर देखील इतर संस्थांपेक्षा जास्त असते. पीएफच्या रकमेवर व्याज देण्यासाठी EPFO कडून हे पैसे ​​अनेक ठिकाणी गुंतवले जातात. तसेच EPFO ​​कडून आपल्याला 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स देखील मिळतो. हा इन्शुरन्स एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड स्कीम अंतर्गत उपलब्ध आहे. जर एखाद्या पीएफ खातेधारकाचा अपघातात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला ईपीएफओकडून 7 लाख रुपयांची मदत दिली जाते.

EDLI स्कीमबाबत जाणून घ्या

EDLI चे पूर्ण रूप एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम आहे. EDLI योजनेद्वारे लोकांना सामाजिक सुरक्षा मिळण्यात मदत होते. या योजनेंतर्गत, सेवेत असताना जर एखाद्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना किंवा कायदेशीर वारसांना 12 महिन्यांसाठी कर्मचाऱ्याच्या मासिक पगाराच्या 35 पट, किंवा जास्तीत जास्त 7 लाख रुपये दिले जातात.

EDLI Scheme for Private Sector Employees

1976 पासून सुरूवात

1976 मध्ये ईपीएफओकडून EDLI योजना सुरू करण्यात आली होती. आपल्या मृत्यूपूर्वी 12 महिन्यांच्या आत कर्मचाऱ्याने एकापेक्षा जास्त संस्थांमध्ये काम केले असेल तर हा इन्शुरन्स त्याचे नातेवाईक आणि कायदेशीर वारसांना दिला जातो. EDLI योजना 2022 अंतर्गत, कर्मचाऱ्याच्या मासिक पगाराच्या 0.5% दराने नियोक्त्याद्वारे किमान योगदान दिले जाते. इथे लक्षात घ्या की, पीएफ खात्यात जमा केलेल्या एकूण रकमेपैकी 8.33% EPS मध्ये, 3.67% EPF आणि 0.5% EDLI योजनेमध्ये जमा केले जातात. अशा परिस्थितीत, EDLI योजनेबाबतची माहिती फार कमी लोकांकडे असते.

नॉमिनीला काय फायदा मिळेल ???

EPFO कडून सर्व खातेधारकांना त्यांच्या खात्यात नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या जातात. जर एखाद्या खातेदाराचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाला तर त्याच्या खात्यात जमा केलेली रक्कम आणि विम्याची रक्कम ही नॉमिनीला दिली जाते. त्याच वेळी, जर नॉमिनीचे नाव जोडले गेले नसेल तर अशा परिस्थितीत, खातेदाराच्या सर्व वारसांच्या सह्या आणि कायदेशीर वारसांचे Succession सर्टिफिकेट दाखवल्यानंतरच पैशांबाबत क्लेम करता येईल.

Max sum assured under EDLI scheme hiked to Rs 7 lakh | India News - Times of India

EDLI योजनेशी संबंधित ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

EDLI योजनेअंतर्गत, कोणत्याही खातेदाराला कमीत कमी 2.5 लाख आणि जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचा इन्शुरन्स क्लेम मिळू शकतो. इथे हे लक्षात घ्या कि, 2.5 लाख रुपयांपर्यंतचा क्लेम मिळवण्यासाठी खातेदाराने कमीत कमी सलग 12 महिने काम केलेले असावे. जर एखाद्या खातेदाराने नोकरी सोडली असेल तर त्याच्या कुटुंबाला हा इन्शुरन्स क्लेम मिळणार नाही. कंपनीकडून EDLI योजनेमध्ये 0.5% योगदान दिले जाते. इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी, नॉमिनीला EPFO ​​कार्यालयात किंवा अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

EDLI योजनेचा उद्देश

एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI) सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अपघाती मृत्यू झाल्यास EPFO ​​अंतर्गत समाविष्ट असलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या स्वरूपात विम्याची रक्कम देणे हा आहे. जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.epfindia.gov.in/site_docs/PDFs/Downloads_PDFs/EDLI_1976.pdf

हे पण वाचा :

Vehicle Scrappage Policy म्हणजे काय ??? त्याचे फायदे जाणून घ्या

Post Office च्या ‘या’ बचत योजनेमध्ये मिळतोय 7 टक्क्यांहून जास्त रिटर्न

FD Rates : ‘या’ स्मॉल फायनान्स बँकांकडून FD वर दिले जाते आहे जास्त व्याज

Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोने झाले स्वस्त तर चांदीच्या किंमतीत वाढ; आजचे दर पहा

Bandhan Bank कडून आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात बदल, नवीन दर पहा