हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Water Plant Business) अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र पैसा ही सुद्धा माणसाची अशी गरज आहे जिच्याशिवाय मानवी जीवनाला अर्थच नाही. आजकाल छोट्यातल्या छोट्या वस्तू खरेदी करण्यासाठी खिसा रिकामी करावा लागतो. अर्थात जगायचे असेल तर पैसा हवा ना बॉस. अशात पैशाच्या मागे धावता धावता वय सरत चाललंय पण तरीही पैसा काही टिकत नाही. जो तो पैसा मिळवण्यासाठी रोज नव्याने शक्कल लढवत असतो. कुणी रोज सकाळी उठून बॅग घेऊन कामाला जातं आणि महिन्याला येणारा पगार जबाबदाऱ्यांवर खर्च करतो. तर कोणी रोज मजुरी करून मिळणारा पैसा घर चालवण्यासाठी वापरत असतं.
तर काही लोक असेही असतात जे रोज नवनवीन शक्कल वापरून नवनवीन बिझनेस आयडिया अमलात आणतात आणि पैसा कमवतात. यातले काही बिझनेस चालतात तर काही फ्लॉप ठरतात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशी बिझनेस आयडिया देणार आहोत. जी फ्लॉप नव्हे तर जबरदस्त हिट आहे. मुख्य म्हणजे आता उन्हाळ्याच्या दिवसात जसजशी गरमी वाढेल तसतसा तुमच्या घरात पैशाचा पाऊस पडायला सुरुवात होईल. कसा? ते पाहुयात.
पाण्यापासून कमवा पैसा (Water Plant Business)
पाणी आणि पैसा या दोन्ही गोष्टी मानवी जीवनासाठी अत्यंत गरजेच्या आहेत. पाण्याशिवाय सजीव पूर्णपणे नष्ट होतील. तर पैशाशिवाय सजीव कसेचं जगतील? आजकाल पैसा हा कोणत्याही गोष्टीपेक्षा फार जास्त महत्त्वाचा झाला आहे. त्यामुळे पैसा कमावण्यासाठी रोज काही ना काही धडपड करावीच लागते. गेल्या काही काळात वाढतं प्रदूषण आणि दूषित पाणी हे गंभीर आजरांच्या फैलावास कारणीभूत ठरले आहेत. त्यामुळे बाटलीबंद पाण्याची मागणी बाजारपेठेत वाढताना दिसतेय. अशातच आता हिवाळा सरल्यानंतर गर्मीचे दिवस सुरू झालेत. अर्थात आत्ता बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय एकदम जोरदार चालेल.
(Water Plant Business) या व्यवसायात दरवर्षी २० टक्क्याने वाढ होत असून अनेक लोक या व्यवसायाचा एक भाग आहेत. मुख्य म्हणजे अत्यंत कमी गुंतवणुकीसह तुम्ही या व्यवसायातून मोठी कमाई करू शकता. RO किंवा मिनरल वॉटरच्या व्यवसायात अनेक बड्या कंपन्या सामील असताना १ रुपयाच्या पिशवी पासून ते २० लिटरच्या जारपर्यंत बाजारात सील बंद पाण्याच्या मागणीचा दर दिवसागणिक वाढतोय. त्यामुळे हा व्यवसाय नक्कीच उत्पन्नाच्या बाबतीत फायदेशीर ठरणारा आहे.
असा उभारा वॉटर प्लांट
यंदाच्या उन्हाळ्यापासून जर तुम्ही बाटलीबंद पाण्याची विक्री सुरु करून पैसा कमावण्याचा विचार करताय तर सर्वात आधी युवा व्यवसायासाठी काय गरजेचे आहे ते समजून घ्या. मिनरल वॉटरचा व्यवसाय करण्यासाठी सर्वात आधी कंपनी स्थापन करा. यानंतर तुमच्या कंपनीची कायद्याअंतर्गत नोंदणी करा. (Water Plant Business) तुमच्या कंपनीचा पॅन क्रमांक आणि जीएसटी नंबर घ्या. सर्व औपचारिकता पूर्ण करून बोरिंग आरो, चिल्लर मशीन आणि कॅन इत्यादी ठेवण्यासाठी १००० ते १५०० स्क्वेअर फुट जागा निवडा. यामुळे पाणी साठवण्यासाठी टाक्या तयार करणे सोपे जाईल. या व्यवसायामध्ये तुम्ही आणि तुमच्या सोबत अजून काही लोकांना सहज रोजगार मिळेल.
‘या’ गोष्टी महत्त्वाच्या
वॉटर प्लांट बसवण्यासाठी तुम्ही निवडलेल्या जागेत TDS पातळी जास्त नसेल याची खात्री करून घ्या. यानंतर प्रशासनाचा परवाना आणि आयएसआय क्रमांक देखील महत्वाचा आहे. तो जरूर घ्या. मोठमोठ्या कंपन्या मोठमोठे वॉटर प्लांट उभारतात. त्यामुळे अशा कंपन्यांना RO प्लांटसाठी अगदी ५० हजारापासून २ लाख रुपये खर्च येतो. (Water Plant Business) पण तुम्हाला १०० जार अर्थात २० लिटर क्षमते इतका वॉटर प्लांट उभारणेदेखील लाभदायी ठरते. ज्यासाठी तुम्हाला कमीत कमी ४ ते ५ लाख रुपये खर्च येईल. यासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता आणि याची प्रोसेस काळजीपूर्वक पूर्ण करून घ्या. जेणेकरून भविष्यात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
किती होईल कमाई?
जर तुम्ही २० लिटर पाण्याच्या क्षमतेचा वॉटर प्लांट उभारला आणि तासाला १००० लिटर पाणी निर्माण करू शकत असाल तर दरमहा तुम्ही किमान ३०,००० रुपये ते ५०,००० रुपये अगदी सहज कमवू शकता. समजा तुमचे नियमित ग्राहक १५० च्या आसपास असतील तर प्रति माणसामागे दररोज १ कंटेनर पुरवठा झाला असे समजून या प्रत्येक कंटेनरची किंमत २५ रुपये पकडल्यास, महिन्याला तुमचे उत्पन्न १ लाख १२ हजार ५०० रुपये इतके होईल. तसेच पगार, भाडे, वीज बिल, डिझेल आणि इतर खर्च काढल्यास १५ हजार रुपये ते २० हजार रुपये तुमचा प्रति महिना नफा असेल. (Water Plant Business)